शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील यांनी आता ठरवावे, हिमालयात जायची की कोठे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापुरातील कोणत्याही जागेवरून आपण निवडून येऊ शकतो. नाही आलो तर थेट हिमालयात जाण्याची भाषा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापुरातील कोणत्याही जागेवरून आपण निवडून येऊ शकतो. नाही आलो तर थेट हिमालयात जाण्याची भाषा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. आता तर १२ वर्षे ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले, त्या पुणे पदवीधर मतदारसंघातून त्यांनीच उभा केलेल्या उमेदवारांचा ५० हजार मतांनी पराभव झाला. आता त्यांनीच ठरवावे, हिमालयात जायचे की आणखी कोठे? अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोरोनाच्या संकटात भाजपने दुटप्पी भूमिका घेतली. सुशांतसिंग राजपूत, कंगना प्रकरणात तर महाराष्ट्राचा अपमान केला. मात्र या निवडणुकीतून जनतेने त्यांना चोख उत्तर दिले. त्यांचे बालेकिल्ले ढासळले असून विजय विनयाने स्वीकारला पाहिजे. सत्तेची आणि संपत्तीची मस्ती फार काळ टिकत नाही. माझे आणि चंद्रकांत पाटील यांचे बांधाचे भांडण नाही; मात्र सत्तेत असताना ते माझ्याशी सुडाने वागले. राजकीय व सामाजिक जीवनातून मला संपविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी चूक कबूल करावी आणि या प्रकरणावर पडदा टाकावा असे आवाहन केले होते. एकटे-एकटे लढण्याची भाषा आता चंद्रकांत पाटील करीत आहेत. कसे लढायचे ते आम्ही ठरवू. हा निकाल पाहिल्यानंतर ‘ ईव्हीएम मशीन असते तर’ असे देेवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील म्हटले असते. तिन्ही पक्षांचे असेच मनोमिलन झाले तर यापेक्षाही चांगले यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी नसती, मंत्री नसतो

चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती, हे खरे आहे. शरद पवार यांच्यावरील भक्तीपुढे मला सत्ता महत्त्वाची वाटत नाही. काही नसताना, माझ्यासारख्या सामान्य माणसाला त्यांनी १६ वर्षे मंत्री केले. कदाचित राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष नसता तर मंत्रीही झालो नसतो, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेतील बदल ठरल्याप्रमाणेच

जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांचा वर्षाचा कालावधी होतो, तेथील बदलाबाबत विचारले असता, ‘आमचे ठरले आहे, त्याप्रमाणेच होईल,’ असे सूचक वक्तव्य मंत्री मुश्रीफ यांनी केले.

‘मनपा’ निवडणुकीबाबत श्रेष्ठींना पटवून देऊ

महापालिका निवडणुकीत बंडखोरी टाळण्यासाठी १५ वर्षे आम्ही वेगवेगळे लढत आहोत. अनेक प्रभागांत दोन्ही कॉग्रेसकडे ताकदीचे उमेदवार आहेत. तिथे एकत्र लढलो तर नुकसान होते. याबाबत पक्षश्रेष्ठींना पटवून देऊ, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

- राजाराम लोंढे