शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांसमोर मराठी शाळा टिकविण्याचे आव्हान

By admin | Updated: September 6, 2015 00:44 IST

हसन मुश्रीफ : महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळातर्फे शिक्षकांचा गौरव

कोल्हापूर : इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे महत्त्व वाढविले जात असतानाच मराठी शाळांचे अस्तित्व राखण्याचे आव्हान शिक्षकांनी स्वीकारावे, असे आवाहन माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांनी शनिवारी सकाळी येथे बोलताना केले. शिक्षणाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांना सोयीसुविधा देण्याकरिता महानगरपालिका प्रशासनाने जादा निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्यावतीने पंधरा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शनिवारी शिक्षकदिनाचे औचित्य साधून विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला, त्यावेळी आमदार मुश्रीफ बोलत होते. कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वातानुकूलित सभागृहात अत्यंत दिमाखदार असा हा सोहळा पार पडला. महापालिकेच्या मराठी शाळेकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला पाहिजे. तेथे चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले गेले पाहिजे, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. प्रशासनाने शहरातील रस्ते, गटारी, ड्रेनेज यासारख्या नागरी सुविधांवर जसा निधी खर्च केला जातो, तसाच तो महापालिकेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही खर्च करण्याची भूमिका घ्यावी, अशी सूचना मांडली. राज्य सरकारकडून आलेल्या वीस कोटींच्या निधीतून दोन कोटींचा निधी हा प्राथमिक शिक्षण मंडळाला द्यावा, अशी सूचना माजी मंत्री सतेज पाटील यांनी यावेळी केली. ते म्हणाले, गेल्या पाच-सात वर्षांत आम्ही महापालिकेच्या शाळांना निधी देण्याचा प्रयत्न केला. सर्व शिक्षा अभियानातून १५० खोल्या बांधल्या. सर्व शाळांमध्ये संगणक उपलब्ध करून दिले. याहीपुढे जाऊन या शाळांना मदत करण्याची आवश्यकता आहे. महापौरांनी राज्य सरकारकडून येणाऱ्या निधीतील दोन कोटी रुपये शाळांसाठी द्यावेत. शिक्षण मंडळाचे उपसभापती भरत रसाळे यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. त्यांनी शिक्षण मंडळाकडील सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. सभापती महेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. दरवर्षी आपण केवळ शिक्षकांना पुरस्कार देत होतो. यंदाच्या वर्षापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. गेल्या पाच वर्षांत शिक्षक, शिक्षण मंडळ सदस्यांनी केलेल्या प्रयत्नांचे यश म्हणून महापालिकेच्या शाळांकडील विद्यार्थी पटसंख्या वाढली आहे, असे जाधव यांनी सांगितले. यावेळी महापौर वैशाली डकरे यांच्यासह समीर घोरपडे, अशोक पोवार, गौरवमूर्तींपैकी महेश ठोंबरे यांचीही भाषणे झाली. प्रशासनाधिकारी प्रतिभा सुर्वे यांनी आभार मानले. कार्यक्रमास उपमहापौर ज्योत्स्ना पवार-मेढे, गटनेते राजेश लाटकर, महिला बालकल्याण समितीच्या सभापती लीला धुमाळ, परिवहन सभापती अजित पोवार यांच्यासह शिक्षण मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)