शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

जनगणनेमध्ये आम्ही आमचा धर्म फक्त ‘लिंगायत’ लिहिणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:43 IST

कोल्हापूर : ‘मी लिंगायत, माझा धर्म लिंगायत’ अशी घोषणा देत लवकरच होणाऱ्या जनगणनेमध्ये आम्ही आमचा धर्म फक्त ‘लिंगायत’ लिहिणार, ...

कोल्हापूर : ‘मी लिंगायत, माझा धर्म लिंगायत’ अशी घोषणा देत लवकरच होणाऱ्या जनगणनेमध्ये आम्ही आमचा धर्म फक्त ‘लिंगायत’ लिहिणार, असा निर्धार शुक्रवारी कोल्हापूर लिंगायत समाज संस्थेच्या प्रबोधन मेळाव्यात करण्यात आला. याबाबत गावोगावी जाऊन लिंगायत समाजातील बांधव- भगिनींचे प्रबोधन करण्याचा ठराव झाला.

दसरा चौकातील चित्रदुर्ग मठातील या मेळाव्यास जागतिक लिंगायत महासभेचे बेळगावचे अध्यक्ष शंकर गुडस, ॲड. शिवानंद हैबतपुरे, माजी आ. प्रकाश शेंडगे, कोल्हापूर लिंगायत समाज संस्थेच्या खजिनदार सरलाताई पाटील प्रमुख उपस्थित होत्या. आमचा संपूर्ण लिंगायत समाज हा पूर्वीपासून स्वतंत्र लिंगायत धर्म आहे. फक्त आमची त्याबाबतची नोंद काढण्यात आली. ती नोंद पुन्हा करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे लवकरच होणाऱ्या जनगणनेमध्ये सर्व लिंगायत समाज धर्माची नोंद करण्यासाठी सात क्रमांकाच्या कॉलममध्ये ‘लिंगायत’ असे लिहिणार आहे. त्याबाबतचा ठराव या प्रबोधन मेळाव्यात एकमताने करण्यात आला. आपण पूर्वीपासून लिंगायत कसे आहोत, आपला धर्म स्वतंत्र कसा आहे, याबाबत कागदोपत्री पुराव्याच्या माध्यमातून लिंगायत समाजातील बांधव-भगिनींचे गावोगावी जाऊन आम्ही प्रबोधन करणार असल्याचे सरलाताई पाटील यांनी सांगितले. जनगणनेचा मुद्दा राजकीय क्षेत्रासह सामाजिक, धार्मिक, आर्थिक, साहित्य क्षेत्राशी संबंधित आहे. त्यामुळे एक मोठा लढा आपल्याला द्यावयाचा आहे. त्यासाठी समाजामध्ये जाऊन आपण ‘मी लिंगायत, माझा धर्म लिंगायत’ हे सांगत त्यांचे प्रबोधन करूया, असे आवाहन ॲड. शिवानंद हैबतपुरे यांनी केले. या लढ्यात आम्ही लिंगायत समाजासोबत असल्याचे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले. शंकर गुडस यांच्या हस्ते जागतिक लिंगायत महासभेच्या कोल्हापूर शाखेचे उद्घाटन करण्यात आले. जागतिक लिंगायत महासभा हे लिंगायत समाजाला न्याय मिळवून देण्यासह बसव धर्माचा प्रचार- प्रसार करणारे संघटन आहे. कोल्हापूरप्रमाणे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या महासभेच्या शाखांची सुरुवात करून सर्वांनी एकोप्याने काम करूया, असे आवाहन गुडस यांनी केले. राजशेखर तंबाके, शिवाजी माळी, अभिषेक मिठारी यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास प्रदीप वाली, मिलिंद साखरपे, चंद्रशेखर बटकडली, विलास आंबोळे, सर्जेराव विभुते, नीळकंठ मुगुळखोड, आदींसह कोल्हापूर, सांगली, उदगीर, बेळगाव येथील लिंगायत समाज बांधव उपस्थित होते. कोल्हापूर लिंगायत समाज संस्थेचे अध्यक्ष बाबूराव तारळी यांनी प्रास्ताविक केले. यश आंबोळे यांनी सूत्रसंचालन केले, तर स्वप्नील जाबशेट्टी यांनी आभार मानले.