पोलीस दलास मास्कचे वाटप करून वाढदिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:25 IST2021-04-21T04:25:06+5:302021-04-21T04:25:06+5:30

कोल्हापूर : येथील दि काॅन्झर्वेशन फौंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आशिष घेवडे यांनी मंगळवारी आपल्या वाढदिवसानिमित्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे ...

Celebrate birthday by distributing police masks | पोलीस दलास मास्कचे वाटप करून वाढदिवस साजरा

पोलीस दलास मास्कचे वाटप करून वाढदिवस साजरा

कोल्हापूर : येथील दि काॅन्झर्वेशन फौंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आशिष घेवडे यांनी मंगळवारी आपल्या वाढदिवसानिमित्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्याकडे कोल्हापूर पोलीस दलातील पोलीस बांधवांसाठी एन ९५ मास्क सुपूर्द केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवसरात्र गस्त घालावी लागत आहे. अशावेळी चांगल्या प्रतीच्या मास्कमुळे त्यांचे संरक्षण होण्यास मदत मिळणार असल्याचे आशिष घेवडे यांनी सांगितले. दरवर्षी पक्ष्यांसाठी घरटी, पाणीपात्र वाटप, वृक्षारोपण आदी उपक्रम वाढदिवसानिमित्त राबवले जातात, मात्र यावर्षी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना जास्तीत-जास्त मास्कची गरज असल्याने, पोलीसांकरिता चांगल्या मास्कचे वाटप करण्याचा निर्णय घेतल्याचे फौंडेशनच्या डाॅ. अंजली पाटील यांनी सांगितले.

यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून, फौंडेशन करत असलेल्या विविध उपक्रमांविषयी अभिनंदन केले. फौंडेशनचे उपक्रम अनुकरणीय असल्याचे सांगून, त्यांनी मास्क दिल्याबद्दल आभार मानले. याप्रसंगी फौंडेशनचे प्रा. संजय पाठारे, ॲड. धैर्यशील पवार, मनीष घेवडे, सौरभ जाधव आदी उपस्थित होते.

------------------------------------

(बातमीदार : संदीप आडनाईक)

फोटो : 20042021-kol-police mask vitran

फोटो ओळी : कोल्हापुरातील काॅन्झर्वेशन फौंडेशनचे अध्यक्ष आशिष घेवडे यांनी वाढदिवसानिमित्त मंगळवारी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्याकडे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एन ९५ मास्क सुपूर्द केले. यावेळी फौंडेशनचे धैर्यशील पवार, डाॅ. अंजली पाटील, प्रा. संजय पाठारे, मनीष घवडे आदी उपस्थित होते.

===Photopath===

200421\20kol_9_20042021_5.jpg

===Caption===

फोटो : 20042021-kol-police mask vitranफोटो ओळी : कोल्हापूरातील काॅन्झरर्वेशन फौंडेशनचे अध्यक्ष आशिष घेवडे यांनी वाढदिवसानिमित्त मंगळवारी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्याकडे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एन ९५ मास्क सुपुर्द केले. यावेळी फौंडेशनचे धैर्यशील पवार, डाॅ.अंजली पाटील, प्रा. संजय पाठारे, मनिष घवडे आदि उपस्थित होते.

Web Title: Celebrate birthday by distributing police masks