शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

‘पेयजल’ची सीबीआय चौकशी करा

By admin | Updated: May 28, 2015 00:58 IST

करवीर पंचायत समिती सभा : अर्जुन पाटील यांची मागणी

कसबा बावडा : गेल्या पाच वर्षांत तालुक्यात झालेल्या एकूण ‘पेयजल’ योजनेपैकी निम्म्यांहून अधिक योजनेत भ्रष्टाचार झाला आहे. कामाच्या निकृष्ट दर्जामुळे या योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे या पेयजल योजनेच्या कामाची ‘सीबीआय’ चौकशी करावी, अशी मागणी करवीर पंचायत समितीच्या मासिक सभेत अर्जुन पाटील यांनी केली. अध्यक्षस्थानी सभापती पूनम महेश जाधव होत्या. पेयजल योजनेत निकृष्ट दर्जाचे बांधकाम, निकृष्ट पाईपलाईन टाकल्यामुळे अवघ्या दीड ते दोन वर्षांतच या योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. या योजनेची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही अर्जुन पाटील यांनी केली. या कामाची चौकशी केली जाईल, असे आश्वासन गटविकास अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी दिले. सचिन पाटील यांनी शाळेत बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप केला. या कामांची चौकशी व्हावी, अशी मागणी केली. राजेंद्र सूर्यवंशी यांनी सध्या ग्रामपंचायतीचा घरफाळा वसुली बंद आहे. ती क्षेत्रफळावर आधारित सुरू करावी, अशी मागणी केली. पाचगावमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पाचगावचा पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, अशी मागणी स्मिता गवळी यांनी केली. दिलीप टिपुगडे यांनी करवीर पंचायतमध्ये आदी खर्च आणि नंतर मंजुरी, असा कारभार चालत असल्याचा आरोप केला. एकात्मिक बालविकास सेवा योजनेमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याच्या आदीच पैसे खर्च टाकण्याचा आरोप केला. मात्र, गटविकास अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी तो फेटाळून लावला. तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून ४०० ते ४५० कृषीपंप जोडण्या प्रलंबित आहेत. वीज वितरणने या जोडण्या त्वरित जोडाव्यात, अशी मागणी राजेंद्र सूर्यवंशी व उपसभापती दत्तात्रय मुळीक यांनी केली. पावसाळा सुरू होण्यापूर्वी तालुक्यातील रस्त्यांचे डांबरीकरण व खड्डे मुजविण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी जयसिंग काशीद व सरदार मिसाळ यांनी केली. भूजगोंडा पाटील यांनी आभार मानले. सभापती पूनम जाधव, उपसभापती दत्तात्रय मुळीक यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली. सभेच्या प्रारंभी पाचगावच्या गायत्री दत्तात्रय सुर्वे हिची पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल व सतीश दत्तात्रय सुर्वे यांची पोलीस दलात नियुक्ती झाल्याबद्दल समितीच्यावतीने सत्कार झाला.