मोटारकारची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:15 AM2021-07-23T04:15:07+5:302021-07-23T04:15:07+5:30

लक्षतीर्थ वसाहतीतून मोटारकार चोरी लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : येथील लक्षतीर्थ वसाहत येथील त्रिमूर्ती गल्लीत घरासमोर उभी केलेली मोटारकार ...

Car theft | मोटारकारची चोरी

मोटारकारची चोरी

Next

लक्षतीर्थ वसाहतीतून मोटारकार चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : येथील लक्षतीर्थ वसाहत येथील त्रिमूर्ती गल्लीत घरासमोर उभी केलेली मोटारकार अज्ञाताने चोरून नेल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. याची तक्रार योगेश सुनील सुतार (वय २१, रा. लक्षतीर्थ वसाहत) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली. संबंधित मोटारकार ही सतीश श्रीपती मतीवडेकर (रा. निपाणी) यांच्याच नावे असून, त्यांच्याकडून दि. २२ मे रोजी त्यांनी ही मोटार खरेदी केली होती; पण ती अद्याप मूळ मालकाच्या नावे होती. या चोरी झालेल्या मोटारीतील स्मार्टकार्ड, फिर्यादी यांचे आधारकार्ड, पॅनकार्डही चोरीस गेल्याची फिर्यादीत म्हटले आहे.

दुचाकीवरून पडल्याने तरुणी जखमी

कोल्हापूर : फुलेवाडी तिसरा ते चौथ्या बसस्टॉपदरम्यान भरधाव दुचाकी घसरल्याने तरुणी जखमी झाली. सविता कृष्णात वरेकर (रा. फुलेवाडी, तिसरा बसस्टॉप), असे जखमी तरुणीचे नाव आहे. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने बेशुद्धावस्थेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. संग्राम नामदेव पाटील (वय २५, रा. फुलेवाडी) हे कामाच्या ठिकाणाहून सविता वरेकर यांना घेऊन घरी जाताना हा अपघात घडला. याची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे.

Web Title: Car theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.