शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

बँकेतून रक्कम काढताना मोजून घ्या !

By admin | Updated: December 2, 2014 00:20 IST

पैसे न मोजल्याने शिक्षिकेला आठ हजारांचा फटका

राधानगरी : बॅँकेतून मोठी रक्कम काढताय... गडबडीत पैसे न मोजता रोखपालावर विश्वास ठेवून पैसे घेताय... पण, कदाचित तुम्हालाही फटका बसू शकतो. काल जिल्हा बॅँकेच्या राधानगरी शाखेतून पैसे काढताना असाच निष्काळजीपणा दाखविल्यामुळे एका शिक्षिकेला एक-दोन नव्हे, तर तब्बल आठ हजार रुपयांचा फटका बसला आहे. फेजिवडे येथील माध्यमिक शिक्षिक ा रोहिणी राजाराम निऊं गरे (रा. सोन्याची शिरोली) यांनी घरबांधकामासाठी माध्यमिक शिक्षक पतसंस्थेतून कर्ज घेतले. संस्थेने त्यांना कोल्हापूर जिल्हा बॅँकेच्या येथील शाखेचा दीड लाखाचा धनादेश दिला. त्यांचे पती राजाराम निऊंगरे यांनी हा धनादेश बॅँकेत वटविला. रोखपालने त्यांना पाचशेच्या नोटांचे पन्नास हजार व शंभराच्या नोटांचे एक लाख रुपये दिले. पाचशेच्या नोटा मशीनद्वारे मोजून दिल्या. मात्र, शंभराच्या नोटांचे प्रत्येकी शंभरप्रमाणे असणारे दहा बंडल सुतळीने एकत्र बांधलेला मोठा गठ्ठा दिला. मोजण्याबाबत विचारता ही रक्कम मुख्य कार्यालयाकडून आल्याने त्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले. निऊंगरे यांनी सुट्या नोटा अगोदर वापरल्या व नंतर वाळू विक्रेत्याला शंभरचे बंडल दिले. मात्र, त्यामध्ये २१ नोटा कमी आढळल्या. तत्काळ त्यांनी घरी येऊन अन्य बंडलातील नोटा मोजल्या. त्यापैकी अन्य एका बॅँकेच्या शिक्क्यांचे लेबल असलेल्या सात बंडलात नोटा बरोबर आढळल्या, पण जिल्हा बॅँकेचे लेबल असणाऱ्या व फक्त रबर असणाऱ्या अन्य दोन बंडलांपैकी एकात ४१ व एकात १७ नोटा कमी आढळल्या. शिवाय यापैकी एक नोट बनावट असल्याचेही आढळले. अशाप्रकारे त्यांना तब्बल आठ हजार रुपये कमी मिळाले. हे निदर्शनाला येताच त्यांनी बॅँकेत धाव घेऊन रोखपालकडे गाऱ्हाणे मांडले; पण त्यांनी ही रक्कम जशी मुख्य कार्यालयाकडून आणली तशी ती न सोडता तुम्हाला दिली आहे. शिवाय तुम्ही बॅँकेच्या काउंटरपासून बाहेर गेल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही, असे सांगितले. यामुळे असा प्रकार इतरांच्या बाबतीत घडू नये, यासाठी कितीही घाई असली तरी नोटा मोजून घेणे अपरिहार्य असल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)