शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

खरेदीदारांकडूनच अडत घेण्याचे आदेश

By admin | Updated: December 21, 2014 00:12 IST

शेतकऱ्यांना दिलासा : पणन संचालकांचा नवा आदेश लागू

प्रकाश पाटील / कोपार्डे गुळासाठी तीन टक्के, कांद्यासाठी अडते अथवा दलालांना द्यावी लागणारी अडत आता खरेदीदाराकडून वसूल करण्याचा आदेश पणन संचालकांकडून बाजार समितीला प्राप्त झाला आहे. यामुळे गूळ उत्पादक शेतकऱ्यांचे १० ते १२ कोटी, तर कांदा उत्पादकांचे १८ ते २० कोटी वार्षिक वाचणार आहेत. बाजार समितीमध्ये शेतकरी आपला शेतीमाल विकण्यासाठी घेऊन जातो, तेव्हा तो सरळ ग्राहकांना अथवा व्यापाऱ्यांना विकत नसे, तर दलालामार्फत अथवा अडत्याकरवी त्याची विक्री व्यापाऱ्यांना होत असे. त्या बदल्यात त्या मालाच्या पैशाची हमी अडत्यावर असे. मात्र, गूळ व काही शेतीमालावरील नियमन रद्द करत अडतही रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने शेतकऱ्यांना पैशाची हमी व गूळ व कांद्यासारख्या नाशवंत मालासाठी गोदाम मिळत नसल्याने अडचणीत आला होता. अलीकडेच शासनाने नियमन पुन्हा सुरू केले आहे. तसेच आजच अडत व दलाली-बाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन गूळ उत्पादक व शेतकऱ्यांना दिलासा आहे. पणन संचालकांचा बाजार समितीला सायंकाळी सहा वाजता गूळ व कांद्याबद्दल शेतकऱ्यांकडून आकारण्यात येणारी अडत अथवा दलाली शेतकऱ्यांकडून न घेता ती खरेदीदारांकडून म्हणजे व्यापाऱ्यांकडून वसूल करावी, अशा आदेशाचा मेलच बाजार समितीला प्राप्त झाला आहे. शेतकऱ्यांचे १० ते १२ कोटी रुपये वाचणार दरवर्षी बाजार समितीमध्ये गुळाची ३०० कोटींची उलाढाल होते. गुळासाठी अडते किंवा दलाल तीन टक्केप्रमाणे अडत अथवा दलाली घेतात. याचा विचार केल्यास किमान १० ते १२ कोटी रुपये शेतकऱ्यांचे गुळासाठी वाचणार आहेत, तर कांद्याची उलाढाल ४०० कोटींची होत असल्याने यामध्ये सहा टक्केप्रमाणे किमान १८ ते २० कोटी अडत अथव दलाली शेतकऱ्यांची वाचणार आहे. शासनाने प्रथम नियमन कायम करून विक्री झालेल्या शेतमालाच्या पैशाला हमी तर अडत व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या आदेशाने गूळ दर घसरणीच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे.