दानोळीत विद्यार्थ्यांनी अडविल्या बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:44 IST2021-02-06T04:44:05+5:302021-02-06T04:44:05+5:30

दानोळी : दानोळीला वेळेवर एस.टी. सेवा मिळत नसल्याने शुक्रवारी येथील छत्रपती शिवाजी चौकात विद्यार्थी व प्रवाशांनी एस. टी. अडवून ...

Buses blocked by students in Danoli | दानोळीत विद्यार्थ्यांनी अडविल्या बसेस

दानोळीत विद्यार्थ्यांनी अडविल्या बसेस

दानोळी : दानोळीला वेळेवर एस.टी. सेवा मिळत नसल्याने शुक्रवारी येथील छत्रपती शिवाजी चौकात विद्यार्थी व प्रवाशांनी एस. टी. अडवून धरली होती. त्यानंतर एस. टी. स्थानकाकडून वेळेवर एस.टी. सोडण्याच्या आश्वासनानंतर एस. टी. सोडण्यात आली. यावेळी जयसिंगपूर पोलीस दाखल झाले होते.

दरम्यान, गुरुवारी दुपारी जयसिंगपूर बसस्थानकात दानोळीला जाणारी एस.टी. रद्द झाली. दानोळीला जाणारे विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय झाली. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या बसमध्ये जाऊन बसले व दानोळीला बस सोडा, असा आग्रह धरला. त्यावर चालक वाहकाने एस. टी. थेट पोलीस ठाण्यात नेली. अगोदरच एस. टी. रद्द करून गैरसोय झाली असताना उलट त्रास देत असल्याने प्रवासी संतापले होते.

तसेच तमदलगे मुक्कामी गाडी दानोळी, कवठेसार, कनवाड, चिंचवाड, कोथळी, निमशिरगांव अशा गावांतून फेऱ्या करत असते पण वारंवार ही एस. टी. रद्द होत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. सध्या शाळा, कॉलेज सुरू झाले असल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर एस. टी. सेवा देणे अपेक्षित होते. पण वारंवार एस. टी. रद्द होत असल्याने प्रवाशांनी शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास एस.टी. अडवून धरल्या होत्या. एस. टी. सेवा पूर्ववत करण्यात येईल, या आश्वासनानंतर एस. टी. बसेस सोडण्यात आल्या.

फोटो - ०५०२२०२१-जेएवाय-०३

फोटो ओळ - दानोळी (ता. शिरोळ) येथे प्रवाशांनी एस. टी. बसेस अडविल्यामुळे मोठी गर्दी झाली होती.

Web Title: Buses blocked by students in Danoli