शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

बिगुल वाजले..गोकुळसाठी २ मे रोजी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 20:04 IST

Gokul Milk Elecation Kolhapur- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघासाठी ( गोकुळ) २ मे रोजी मतदान होणार आहे. गुरुवार (दि. २५) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. हा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. 

ठळक मुद्देगुरुवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात निवडणूक कार्यक्रम मंजुरीसाठी प्राधिकरणाकडे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघासाठी ( गोकुळ) २ मे रोजी मतदान होणार आहे. गुरुवार (दि. २५) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. हा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. गोकुळ निवडणूक स्थगितीसाठी सत्तारुढ गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे तर विरोधी गटाने सोमवारी राजर्षी शाहू आघाडीची घोषणा करून मैदानात शड्ड ठोकला आहे. अंतिम मतदार यादी १२ मार्च रोजी प्रसिद्ध झाली आहे. सहकार निवडणूक कायद्यानुसार अंतिम यादीनंतर दहा ते वीस दिवसात प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे बंधनकारक असते. त्यानुसार सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी नावडकर यांनी कार्यक्रम मंजुरीसाठी प्राधिकरणाकडे पाठवला. सोमवारी, विरोधी आघाडीची घोषणा झाली, त्यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी कार्यक्रम दोन दिवसात जाहीर होईल, असे सुतोवाच केले होते.निवडणुकीत सत्तारुढ गटाचे नेते आमदार पी.एन.पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक विरुद्ध पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातच थेट सामना होत आहे. महाडिक कुटुंबाकडील ही महत्त्वाची आर्थिक व राजकीय सत्ता आहे.आतापर्यंत त्यांच्याभोवती फिरणारी ही निवडणूक त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा फैसला करणारी आहे..असा राहील कार्यक्रम ः

  • अर्ज दाखल करणे - २५ ते ३१ मार्च
  • अर्जाची छाननी - १ एप्रिल
  • पात्र उमेदवारांची घोषणा - ३ एप्रिल
  • माघार -२० एप्रिल
  • मतदान - २ मे
  • मतमोजणी - ४ मे

दृष्टिक्षेपात गोकुळ

  • संस्था सभासद म्हणजेच मतदार - ३६५०
  • संचालक संख्या - २१
  • वार्षिक उलाढाल - २२०० कोटी
  • दूध उत्पादक - साडेसहा लाख
  • गेली सुमारे २५ वर्षे महादेवराव महाडिक व पी.एन.पाटील यांची सत्ता
टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर