संक्षिप्त महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:49 IST2020-12-05T04:49:49+5:302020-12-05T04:49:49+5:30

इचलकरंजी : येथील नारायणी अपार्टमेंटमधील एकाने राहत्या घरी पंख्याला ओढणीच्या सहायाने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. अमर श्रीनिवास कुलकर्णी ...

Brief important | संक्षिप्त महत्त्वाचे

संक्षिप्त महत्त्वाचे

इचलकरंजी : येथील नारायणी अपार्टमेंटमधील एकाने राहत्या घरी पंख्याला ओढणीच्या सहायाने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. अमर श्रीनिवास कुलकर्णी (वय ४५) असे त्यांचे नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. याबाबतची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे.

..................

इचलकरंजीला दिलासा

इचलकरंजी : शहरात बुधवारी एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे शहराला दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत एकूण बाधित रुग्णांची संख्या चार हजार ३ वर, तर मृत्युसंख्या १९४ वर स्थिर आहे. आतापर्यंत तीन हजार ८०१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आठजणांवर उपचार सुरू आहेत.

Web Title: Brief important