शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर मंडल अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात

By admin | Updated: December 18, 2015 01:20 IST

दाटे येथील प्रकार : जमीन एनए करण्यासाठी २५ हजारांची लाच स्वीकारली

चंदगड : जमीन एन. ए. (अकृषक) करण्यासाठी पंटराकरवी २५ हजार रुपयांची लाच घेताना नागनवाडी (ता. चंदगड) येथील सजाचे मंडल अधिकारी सुरेश शिवाजी बन्ने (मूळगाव माणगाव, ता. हातकणंगले) व पंटर परशराम जोतिबा आवडण (रा. बेळेभाट, ता. चंदगड) यांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. दाटे येथील तलाठी कार्यालयात ही कारवाई झाली. दाटे येथील तक्रारदाराने काजू फॅक्टरी काढण्यासाठी ही जमीन अकृषक करण्याचा प्रस्ताव चंदगड तहसील कार्यालयात दिला होता; पण या प्रस्तावातील त्रुटी काढून देण्यासाठी तक्रारदार मंडल अधिकारी बन्ने यांना नागनवाडी कार्यालयात भेटले. यावेळी या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी तडजोडीअंती २५ हजार रुपयांची मागणी बन्ने यांनी केली. दरम्यान, तक्रारदाराने कोल्हापूर येथील लाचलुचपत विभागाकडे यासंदर्भात तक्रार केल्याने सापळा रचला. ठरलेली रक्कम देण्यासाठी मंडल अधिकारी बन्ने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दाटे येथील तलाठी कार्यालयातील आपला पंटर परशराम आवडण यांच्याकडे पैसे देण्यास सांगितले. त्यानुसार ही रक्कम देण्यासाठी तक्रारदार आवडण यांच्याकडे गेले असता त्याला रंगेहात पकडण्यात आले. मंडल अधिकारी बन्ने व पंटर आवडण यांच्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. चंदगड तालुक्यात दोन महिन्यांपूर्वी माणगावचे मंडल अधिकारी विनायक आरगे व तुडयेचे तलाठी सुधाकर देसाई यांना लाचलुचपत विभागाने पकडले होते. दोन महिन्यांत महसूलच्या तीन अधिकाऱ्यांना लाचलुचपत विभागाने लाच घेताना पकडले आहे. त्यामुळे तहसील कार्यालयाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन संकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम, हवालदार मनोहर खणगावे, अमर भोसले, दयानंद कडूकर, मनोज खोत, आदींच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)