शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

आजऱ्यात ज्याची एन्ट्री त्यालाच तोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:01 IST

सदाशिव मोरे आजरा : बंद असलेला आजरा साखर कारखाना, तोडणी मजुरांकडून होणारी प्रचंड लूट, वेळेत उसाची तोड नसल्यामुळे वाळणारा ...

सदाशिव मोरे

आजरा : बंद असलेला आजरा साखर कारखाना, तोडणी मजुरांकडून होणारी प्रचंड लूट, वेळेत उसाची तोड नसल्यामुळे वाळणारा ऊस, क्रमपाळीचा उडालेला फज्जा यामुळे आजरा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. खतांचे वाढलेले दर, जंगली जनावरांचा सुरू असलेला उपद्रव, उसाच्या वजनात झालेली घट यामुळे साखर सम्राटांबद्दल तालुक्यातील शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या टोळीला ज्यांची एन्ट्री त्यालाच तोड मिळत असल्याने शेतकरी राजा मेटाकुटीला आला आहे.

आजरा साखर कारखाना झाल्यानंतर ऊस वेळेत जाणार, चांगला दर मिळणार या भ्रामक कंल्पनेत असलेल्या शेतकरी राजाला गेल्यावर्षीपासून ऊस वाळवून घालण्याची वेळ आली आहे. आर्थिक अडचणीत सापडलेला आजरा साखर कारखाना गेल्यावर्षीपासून बंद आहे. उसाचे क्षेत्र वाढले आहे; पण बंद कारखान्यामुळे ऊस कारखान्याला घालविताना शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. ऊसतोड पाहिजे असल्यास ३५०० ते ५००० पर्यंत एन्ट्री ट्रकमालकासह टोळी मुकादमाला द्यावी लागत आहे. ऊस वाळवून घालण्यापेक्षा एन्ट्री देऊन घालविला जात आहे. ऊस वेळाने जात असल्याने नवीन लागण व आहे त्या उसाला पाण्याची कमतरता भासत आहे. पाठविलेल्या उसाची बिले महिना ते दीड महिन्यानंतर मिळत असल्याने सेवा संस्थांसह बँकांच्या कर्जाचा बोजा वाढतच आहे. वेळेत उसाची तोड होत नसल्याने ऊस पेटवून पाठविण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे.

- तालुक्यात जवळपास ५४०० ते ५६०० हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड केली जाते. सध्या सव्वादोन लाख टन ऊस उत्पादित होतो. चालूवर्षी कारखाना बंद असल्याने शेजारील कारखान्यांनी तालुक्यातील फक्त ३० टक्के वसुली उचल केली आहे. ७० टक्के ऊस शिल्लक असल्याने शिवारभर पांढरे तुरेच दिसत आहेत.