शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला रे बोंबलाऽऽ कोरोनाच्या नावानं बोंबलाऽ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:12 IST

कोल्हापूर : कोरोनाच्या नावानं बो बो बोंबला रेऽऽ म्हणत कोल्हापूरकरांनी रविवारी पर्यावरणपूरक होळी साजरी केली. होळीच्या आगीत कोरोनाचे विषाणू ...

कोल्हापूर : कोरोनाच्या नावानं बो बो बोंबला रेऽऽ म्हणत कोल्हापूरकरांनी रविवारी पर्यावरणपूरक होळी साजरी केली. होळीच्या आगीत कोरोनाचे विषाणू भस्मसात होऊ दे, अशी प्रार्थना करत होळी लहान करा, पोळी दान करा, रस्ते खराब होऊ नयेत याची काळजी घ्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत नागरिकांनी या सणाचा आनंद लुटला.

गतवर्षी होळी साजरी झाली आणि कोरोनाा संसर्ग सुरू झाला. आता गेल्या दहा दिवसांपासून पुन्हा संसर्ग वाढू लागल्याने रविवारी कोल्हापूरकरांनी या कोरोनाच्या नावाने शंख करत होळी पेटवली. यानिमित्त घराघरात पुरणपोळीचा बेत होता. सायंकाळी प्रत्येक घरासमोर लहान आकारात होळी पेटविण्यात आली तर होळीत प्रतीकात्मक नैवेद्य ठेवून होळीची पोळी गरजूंना दान करण्यात आली. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी होळीमुळे रस्ते खराब होऊ नये याची काळजी घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार मंगळवार पेठेतील प्रिन्स क्लब खासबागच्या वतीने रस्त्यापासून अडीच फूट उंचीवर अंतराळी होळी पेटवण्यात आली व पंचगंगा स्मशान दानपेटीत सातशे एक रुपयांचा निधी देण्यात आला. संदीप पोवार, संकेत जोशी, अभिजित पोवार, सागर सामंगडकर, सौरभ पोवार, रामचंद्र जगताप यांनी संयोजन केले.

इंडियन मार्शल आर्ट थांग -ता असोसिएशनच्या वतीने शनिवारी सायंकाळी प्रबोधन जनजागृती रॅली काढण्यात आली. महावीर गार्डन, कलेक्टर ऑफिस ते रंकाळा येथे युवक खेळाडूंनी ‘प्रदूषण करू नका, पृथ्वीला कष्ट देऊ नका’, ‘प्रदूषणाचा धोका अणुयुद्धापेक्षा मोठा’, ‘प्रदूषण हटवा, पर्यावरण वाचवा’, ‘होळी लहान करा, पोळी दान करा’, ‘होळी लहान करा, पर्यावरणाचे रक्षण करा’, ‘होळी लहान करा, शेणी दान करा’, ‘नको मोठी होळी, आरोग्यास होईल हानी’, ‘होळी लहान करा, प्रदूषण टाळा’, असे फलक घेऊन ही रॅली काढण्यात आली. संघटनेतर्फे अनिल शेंडगे, भूषण पाटील, अरुण पाटील, सुहास पाटील, सिकंदर कांबळे यांनी पंचगंगा स्मशानभूमीस शेणी दान केली. सतीश वडणगेकर, सचिव ऋत्विका शिंदे, महादेव वडणगेकर तसेच महावीर धुलधर यांनी संयोजन केले.

संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित शेणीदान उपक्रमासाठी श्री महालक्ष्मी फेरीवाले संघटनेच्या वतीने शेणीदान करण्यात आल्या. यावेळी शारंगधर देशमुख, अविनाश उरसाल, किरण गवळी, मोहन तगारे, बजरंग फडतारे, राजू कालेकर, सच्चू दर्यानी यांच्यासह फेरीवाला संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

---

फोटो नं २९०३२०२१-कोल-प्रिन्स क्लब

ओळ : मंगळवार पेठेतील प्रिन्स क्लबच्या वतीने रविवारी रस्त्याची काळजी घेत अंतराळी होळी पेटविण्यात आली.

---

फाेटो नं २९०३२०२१-कोल-श्रमिक होळी

ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी गेल्या २८ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. रविवारी या प्रकल्पग्रस्तांनी आंदाेलन स्थळी होळी साजरी केली.

----

श्रमिकच्यावतीने आंदोलनस्थळी होळी

चांदोली अभयारण्यग्रस्त व वारणा धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने गेल्या २८ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदाेलन सुरु आहे. सगळे कोल्हापूरकर आपआपल्या घरी आनंदाने हा सण साजरा करत असताना या प्रकल्पग्रस्तांनी आंदाेलनाच्या ठिकाणी होळी पेटवली. शासन आणि प्रशासनाला जाग येवून त्यांनी आमच्या न्याय्य मागण्यांची तातडीने पूर्तता करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

--