विद्युत खांबाला बांधलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला, कोल्हापुरात उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 13:09 IST2025-12-01T13:08:27+5:302025-12-01T13:09:19+5:30
कोल्हापूर : येथील हॉकी स्टॅडियम परिसरात विद्युत खांबाला बांधलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. काही नागरिकांना ...

संग्रहित छाया
कोल्हापूर: येथील हॉकी स्टॅडियम परिसरात विद्युत खांबाला बांधलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. काही नागरिकांना सकाळच्या सुमारास ही बाब निर्दशनास आली. याबाबत तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
मृत तरुणाच्या गळ्याभोवती वायर गुंडाळेली आढळून आली आहे. त्यामुळे ही आत्महत्या की हत्या हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांकडून तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. मध्यरात्री हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. पोलिस तपासानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेने मात्र परिसरात एकच खळबळ उडाली होती.