जिल्हा काँग्रेसतर्फे उद्या रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:25 IST2021-04-04T04:25:37+5:302021-04-04T04:25:37+5:30

कोल्हापूर : कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रक्तपेढ्यांमध्ये रक्ताच्या कमी पिशव्या उपलब्ध आहेत. ही गरज ओळखून कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने ...

Blood donation camp by District Congress tomorrow | जिल्हा काँग्रेसतर्फे उद्या रक्तदान शिबिर

जिल्हा काँग्रेसतर्फे उद्या रक्तदान शिबिर

कोल्हापूर : कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रक्तपेढ्यांमध्ये रक्ताच्या कमी पिशव्या उपलब्ध आहेत. ही गरज ओळखून कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने उद्या, सोमवारी सकाळी नऊ वाजता स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटी कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. यात स्वत: पालकमंत्री सतेज पाटील रक्तदान करणार आहेत. जिल्ह्यात सध्या कोरोना लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. लसीकरण झाल्यानंतर दोन महिने रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे बऱ्याच जणांना रक्तदान करता येत नाही. परिणामी रक्तपेढ्यांमध्ये कमी प्रमाणात रक्तदान होत आहे. भविष्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये आठ दिवस पुरेल एवढाच साठा आहे. ही अडचण लक्षात घेऊन पालकमंत्री पाटील यांच्या पुढाकाराने व जिल्हा काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन सचिव संजय पोवार (वाईकर) यांनी केले आहे.

Web Title: Blood donation camp by District Congress tomorrow