सह्याद्रीत ‘ब्लॅक पँथर’ची एन्ट्री! चांदोलीत पहिल्यांदाच काळ्या बिबट्याचे दर्शन; चांदोली राष्ट्रीय उद्यानात पहिलीच ऐतिहासिक नोंद

By संदीप आडनाईक | Updated: April 23, 2026 14:50 IST2026-04-23T14:48:59+5:302026-04-23T14:50:28+5:30

कॅमेरा ट्रॅपमध्ये दुर्मिळ क्षण कैद : चांदोली राष्ट्रीय उद्यानात पहिलीच ऐतिहासिक नोंद

Black Panther' enters Sahyadri Black leopard sighted for the first time in Chandoli | सह्याद्रीत ‘ब्लॅक पँथर’ची एन्ट्री! चांदोलीत पहिल्यांदाच काळ्या बिबट्याचे दर्शन; चांदोली राष्ट्रीय उद्यानात पहिलीच ऐतिहासिक नोंद

सह्याद्रीत ‘ब्लॅक पँथर’ची एन्ट्री! चांदोलीत पहिल्यांदाच काळ्या बिबट्याचे दर्शन; चांदोली राष्ट्रीय उद्यानात पहिलीच ऐतिहासिक नोंद

कोल्हापूर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात प्रथमच काळ्या बिबट्याची (मेलॅनिस्टिक लेपर्ड) नोंद झाली आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानात २० एप्रिल रोजी कॅमेरा ट्रॅपमध्ये या दुर्मिळ प्राण्याचे छायाचित्र टिपले गेले. २० आणि २१ एप्रिल रोजी वेगवेगळ्या बीटमध्ये तीन स्वतंत्र छायाचित्रे मिळाल्याने या भागात काळ्या बिबट्याची उपस्थिती निश्चित झाली आहे. यापूर्वी प्रकल्पात अशा प्रकारची नोंद कधीच झाली नव्हती.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अनेक दुर्मिळ आणि संकटग्रस्त सस्तन प्राण्यांचा आढळ आहे. परंतु, प्रकल्पामधून यापूर्वी काळ्या रंगाच्या बिबट्याची नोंद झालेली नव्हती. मात्र, बुधवार दि. २२ एप्रिल रोजी चांदोली राष्ट्रीय उद्यानात कॅमेरा ट्रॅप तपासण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांना काळ्या बिबट्याचे छायाचित्र कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपलेले मिळाले. २० आणि २१ एप्रिल रोजी तीन वेगवेगळी छायाचित्र ही वेगवेगळ्या बीटमध्ये टिपली गेली. त्यामुळे काळ्या बिबट्याची व्याघ्र प्रकल्पामधून पहिल्यांदाच नोंद झाली.

‘ब्लॅक पँथर’ बिबट्याचाच प्रकार

‘ब्लॅक पँथर’ ही स्वतंत्र प्रजाती नसून बिबट्याचाच एक प्रकार आहे. शरीरात मेलानीन रंगद्रव्य जास्त असल्याने रंग पूर्ण काळा दिसतो.
काळ्या रंगातही ठिपक्यांचा (रोझेट) पॅटर्न काहीवेळा दिसतो. ही अनुवांशिक अवस्था असून कोणताही आजार नाही. भारतात ‘ब्लॅक पँथर’ म्हणजे काळा बिबट्याच मानला जातो.

वन्यजीव संवर्धनासाठी सकारात्मक संकेत

या नोंदीमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधतेला नवे महत्त्व प्राप्त झाले असून वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने हा अत्यंत सकारात्मक आणि ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची वैशिष्ट्ये
-स्थापना : ५ जानेवारी २०१०

-क्षेत्रफळ : १,१६५.५७ चौ.कि.मी.
-समावेश : चांदोली राष्ट्रीय उद्यान, कोयना वन्यजीव अभयारण्य.

Web Title : सह्याद्री में पहली बार दिखा ब्लैक पैंथर!

Web Summary : सह्याद्री टाइगर रिजर्व के चांदोली राष्ट्रीय उद्यान में ब्लैक पैंथर (मेलानिस्टिक तेंदुआ) देखा गया। कैमरे में तीन तस्वीरें कैद, उपस्थिति की पुष्टि। रिजर्व के लिए पहली बार, जैव विविधता और संरक्षण प्रयासों पर प्रकाश डाला गया।

Web Title : Black Panther Spotted in Sahyadri Tiger Reserve for First Time

Web Summary : A black panther (melanistic leopard) was spotted in Chandoli National Park, Sahyadri Tiger Reserve. Camera traps captured three images, confirming its presence. This is a first for the reserve, highlighting biodiversity and conservation efforts.