शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता अभियान, आशासेविका सन्मानद्वारे भाजपचे ‘सेवा ही संघटन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST

कोल्हापूर : कोविड रुग्णांची सेवा आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत, आशासेविकांचा सन्मान, स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून भाजपने रविवारी शहरात ‘सेवा ...

कोल्हापूर : कोविड रुग्णांची सेवा आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत, आशासेविकांचा सन्मान, स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून भाजपने रविवारी शहरात ‘सेवा ही संघटन’ उपक्रम राबविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारच्या सात वर्षांच्यापूर्तीबद्दल हा उपक्रम आयोजित केला आहे. स्वच्छता अभियानात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सहभागी झाले. त्यांनी पीपीई किट घालून पद्मावती मंदिरजवळील सार्वजनिक स्वच्छतागृह परिसरात सॅॅनिटायझरची फवारणी केली.

शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आशासेविकांना प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. देशातील एक लाख गावांमध्ये ‘सेवा ही संघटन’ उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत आशा सेविका, नर्सेस, सफाई कर्मचारी, डॉक्टर, पोलीस, बँक कर्मचारी अशा कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात येत आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीला भिडण्याचे काम त्या करत आहेत. अनेक सेविका कोरोनाबाधित झाल्या तरी त्यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून काम सुरू ठेवले असल्याचे पाटील यांनी सांगितले. मानधन वाढीसाठी प्रयत्न करण्याची मागणी आशासेविकांनी केली. यावेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस हेमंत आराध्ये, महिला जिल्हाध्यक्षा गायत्री राऊत, माजी नगरसेवक अजित ठाणेकर आदी उपस्थित होते. दरम्यान, टेंबलाईवाडी, कनाननगर, यादवनगर, पद्मावती मंदिर नजीक, लाड चौक, गंगावेश परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची सफाई करण्यात आली. पद्मावती गार्डन, गणपतराव माने हॉल उत्तरेश्वर, राजारामपुरी नऊ नंबर शाळा, सावित्रीबाई फुले रुग्णालय, गोळीबार मैदान परिसरात आशा सेविका, कोरोना योद्ध्यांचा भाजप प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

चौकट

आयुर्वेदिक काढा वाटप

सदर बाजार लसीकरण केंद्रामध्ये ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या हस्ते महिलांना सन्मान पत्र व भेट वस्तू देण्यात आल्या. मंगलधाम कार्यालय, आयसोलेशन हॉस्पिटल, पंचगंगा हॉस्पिटल, जैन मठ, शहाजी कॉलेज, सायबर कॉलेज, कसबा बावडा कोविड सेंटरमध्ये आयुर्वेदिक काढा वितरण करण्यात आला. सीपीआर, सावित्रीबाई फुले रुग्णालयात चपाती-भाजी वाटप केले.

फोटो (३००५२०२१-कोल-भाजप फोटो, ०१) : कोल्हापुरातील निवृत्ती चौकात रविवारी ‘सेवा ही संघटन’ उपक्रमाअंतर्गत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आशासेविकांना भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. यावेळी शेजारी अशोक देसाई, अजित ठाणेकर, महेश जाधव, राहुल चिकोडे, आदी उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)

फोटो (३००५२०२१-कोल-भाजप फोटो ०२,०३,०४) : कोल्हापुरात रविवारी ‘सेवा ही संघटन’ उपक्रमाअंतर्गत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पीपीई किट घालून पद्मावती मंदिरजवळील स्वच्छतागृह परिसरात सॅॅनिटायझर फवारणी केली. (छाया : नसीर अत्तार)