शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

भाजपला देशातून घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 3:57 PM

माझे हेलिकॉप्टर भरकटले, मी कागलला पोहोचलो नाही, याचे विरोधकांना बरे वाटले. पण भाजपला देशातून घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. अच्छे दिनच्या नावाने १२५ कोटी जनतेला फसवले अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी येथे केली.

ठळक मुद्देभाजपला देशातून घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : धनंजय मुंढेराष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यव्यापी परिवर्तन निर्धार यात्रेला सुरुवात

सरवडे/कोल्हापूर : माझे हेलिकॉप्टर भरकटले, मी कागलला पोहोचलो नाही, याचे विरोधकांना बरे वाटले. पण भाजपला देशातून घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. अच्छे दिनच्या नावाने १२५ कोटी जनतेला फसवले अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी येथे केली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यव्यापी परिवर्तन निर्धार यात्रेला कोल्हापूर जिल्ह्यातून सुरुवात झाली. कागलनंतर भुदरगड तालुक्यातील मुदाळ येथे झालेल्या जाहीर सभेत मुंडे बोलत होते. त्यांच्यासोबत व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील, आदी उपस्थित होते.धनंजय मुंढे यांनी सरकारवर कडक शब्दात टीका केली. सरकारने खाती उघडली, पण अजून १५ लाख जमा केलेले नाहीत. पेट्रोल, डाळ, गॅस आमच्यावेळी स्वस्त होते, मात्र आज पेट्रोल ६० चे ९२ रुपये झाले. ४०० रुपयांचा गॅस १००० रुपये झाला. गॅसच्या एका टाकीमागे ६२५ रुपये लुटले, तेही दिवसाढवळ्या. देशातील अन्य राज्यांनी तसेच फ्रान्सनेही ५७० कोटीला एक अशी विमाने खरेदी केली. तर भारताने १६७० कोटी रुपयांना एक अशी ३६ विमाने खरेदी केली. जुन्या कंपनीची स्पेअर पार्ट पुरवण्याची आॅर्डर बदलून ती अनिल अंबानी यांना दिली, अशा शब्दात राफेल करारावर मुंढे यांनी टीका केली. याबाबत गुन्हा नोंद होईल म्हणून चांगल्या अधिकाऱ्यांची रात्री दोन वाजता बदली केली, अशी टीका मुंडे यांनी केली.मी चौकीदार म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींच्या व्यासपीठावर घोटाळा करणारे मंत्री कसे काय हजर असतात, असा सवाल करुन धनंजय मुंढे यांनी १६ मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला. त्यांना संरक्षण कोण देतय असा सवाल केला. तीन मंत्र्यांच्या तुकड्यासाठी शिवसेनेने लाजारी पत्करली अशी टीका करुन सरकारने पाच लाख कोटी रुपयांचे कर्ज केले केले आणि महाराष्ट्राचे वाटोळे केले.

या सरकारच्या कालावधीत निरव मोदी, मल्ल्या यांनी देशातील अनेक बँकांना बुडवले, तर शेतकऱ्याला फसवी कर्जमाफी दिली. परदेशातील काळा पैसा आणला नाही, अशी टीका प्रदेशाध्यक्ष, माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केली.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेkolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस