भाजपतर्फे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 15:19 IST2021-05-08T15:09:25+5:302021-05-08T15:19:13+5:30
CoronaVIrus Bjp Kolhapur : भाजप महानगर कोल्हापूरच्यावतीने गरजू रूग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या उपक्रमाचा प्रारंभ प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शनिवारी झाला. सध्या गरजूंसाठी दहा कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

भाजपतर्फे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सुविधा
कोल्हापूर : भाजप महानगर कोल्हापूरच्यावतीने गरजू रूग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या उपक्रमाचा प्रारंभ प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शनिवारी झाला. सध्या गरजूंसाठी दहा कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
आमदार पाटील म्हणाले, भाजपतर्फे राज्यात अशा पध्दतीचे एक हजार कॉन्सन्ट्रेटर देण्याची योजना आहे. परंतू टंचाई असल्याने आम्हांला कोल्हापूरसाठी ५० ची गरज असताना केवळ दहाच मिळाले. तरीही भाजप शहर कार्यालयातून ते नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील.
रूग्णालयात दाखल होण्याआधी किंवा गरज असेल त्या वेळी डॉक्टरांच्या शिफारशीनंतर हे कॉन्सन्ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरामध्ये पुरेशी व्यवस्था झाल्यानंतर तालुका पातळीवर ही सोय करण्याचा विचार आहे. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, अशोक देसाई, विजय जाधव, अजित ठाणेकर, हेमंत आराध्ये, दिलीप मैत्राणी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.