शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडे महापौरपद; शिंदेसेनेकडे स्थायी समिती; कोल्हापूर महापालिकेत फॉर्म्युला शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 12:10 IST

महापौर, उपमहापौरांसह सर्व पदाधिकारी महायुतीचे होण्याची ही महापालिकेच्या इतिहासातील पहिलीच घटना

कोल्हापूर : मुंबई महापालिकेतील महापौरपदाचा आग्रह शिंदेसेनेने मागे घेतल्याने कोल्हापूर महानगरपालिकेत भाजपचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानण्यात येत आहे. महायुतीत भाजपने २६ जागा जिंकून मोठा भाऊ असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे महायुतीचा पहिला महापौर भाजपचा होईल, हे स्पष्ट झाले आहे. महापौरपद भाजपकडे गेले तर स्थायी समिती सभापतिपदावर शिंदेसेना आपला हक्क सांगणार आहे.महानगरपालिका वर्तुळात आता नवीन पदाधिकारी निवडीची चर्चा सुरू झाली आहे. कोण होणार महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती याबाबत तर्क-वितर्क लढविले जाऊ लागले आहेत. महापालिकेचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ नेते, मंत्री हसन मुश्रीफ यांनी मागच्या तीन पंचवार्षिक निवडणुकीत महापालिकेत नेतृत्व केले आहे. पद वाटपाचे फाॅर्म्युले त्यांना माहीत आहेत. त्यामुळे ते सांगतील तो फाॅर्म्युले ठरविले जाण्याची शक्यता आहे.

वाचा: एकवेळ महापौरपद नाही मिळाले तरी चालेल पण काँग्रेससोबत आघाडी नाही, राजेश क्षीरसागर यांची स्पष्टोक्तीभाजपकडे महापौरपद गेल्यास उपमहापौरपद आणि स्थायी समिती सभापतिपद शिंदेसेनेकडे जाणार आहे. कारण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारकिर्दीत हाच फॉर्म्युला अवलंबिला गेला होता. शिवसेनेला यापूर्वी सत्तेत वाटा मिळाला आहे. २०१५ ते २०२० या काळात शिवसेना एक होती तेव्हा परिवहन समिती सभापतिपद सलग चार वर्षे त्यांना दिले होते. हाच फाॅर्म्युला आता राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी वापरला जाऊ शकतो. महापौर, उपमहापौरांसह सर्व पदाधिकारी महायुतीचे होण्याची ही महापालिकेच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांत उत्साह आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP likely to get Mayor post, Shinde's Sena, Standing Committee in Kolhapur.

Web Summary : Kolhapur may see BJP mayor as Shinde's Sena eyes standing committee. Power-sharing formula likely follows past Congress-NCP arrangements. This is the first time all positions may be held by Mahayuti.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६MahayutiमहायुतीMayorमहापौरBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे