शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
3
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
4
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
5
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
6
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
7
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
8
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
9
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
10
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
11
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
12
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
14
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
15
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
17
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
18
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
19
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
20
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
Daily Top 2Weekly Top 5

हुपरी शहरात कोट्यवधीची विकासकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:23 IST

हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) शहरात शासनाच्या विविध प्रकारच्या योजनेतून विकासकामे धडाक्यात सुरू आहेत. शहरातील विविध भागातील ३६ रस्त्यांचे ...

हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) शहरात शासनाच्या विविध प्रकारच्या योजनेतून विकासकामे धडाक्यात सुरू आहेत. शहरातील विविध भागातील ३६ रस्त्यांचे दर्जेदार डांबरीकरण व काँक्रिटीकरण करणे, नाले-गटारीची बांधकामे करणे व पेव्हिंग ब्लॉक बसविणे तसेच शाहू तालीम इमारत नूतनीकरण अशी जवळपास ५ कोटी रुपये खर्चाची विविध प्रकारची विकासकामे पूर्णत्वास येत आहेत. शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या विकासकामांच्या धडाक्यामुळे रौप्यनगरी हुपरी शहराला नवा लूक प्राप्त होत असल्याचे चित्र अनुभवावयास मिळत आहे.

नगरपरिषदेला सन २०१८-१९ करिता रस्ते अनुदान ३५ लाख, तर नवीन नगरपरिषद विशेष साहाय्य अनुदान योजनेतून २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. तसेच २०१९-२० करिता रस्ते अनुदान ३५ लाख, दलितेतर योजना १६ लाख, दलित वस्ती ५० लाख, नवीन नगरपरिषद विशेष साहाय्य योजना १ कोटी इतका निधी प्राप्त झालेला आहे.

मागील वर्षी कोरोनाची पार्श्वभूमी, पावसाळा आदी कारणांमुळे ही विकासकामे अपूर्ण राहिली होती. नगराध्यक्षा जयश्री गाट व प्रशासनाच्या नियोजनबद्ध कामकाजातून कोणताही निधी परत जाणार नाही याची काळजी घेतली. त्यामुळे शहरात सध्या विकासकामांचा मोठ्याप्रमाणात धडाका सुरू आहे. अंबिकानगर, गंगानगर, सिद्धार्थनगर आदी भागांतील रस्ते अरुंद असल्याने या भागातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. शहरातील विविध वसाहतीतील ३६ रस्त्यांच्या कामाबरोबरच लाईट व्यवस्था, पाणीपुरवठा आदी कामेही उत्तमरीत्या पूर्णत्वास येत आहेत. शहरात होत असलेल्या सर्व प्रकारच्या दर्जेदार विविध विकासकामांमुळे शहराला नवा लूक प्राप्त होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

:चौकट:

नगराध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून शहरात जास्तीत जास्त विकासकामे राबविण्यासाठी प्रयत्नशील राहिली आहे. सध्या होत असलेले रस्ते आधुनिक पेव्हर मशीनने दर्जेदार होत आहेत. याबरोबरच शहरात आणखीन ३०० पथदिवे बसविण्यात येणार आहेत. या सर्व विकासकामामुळे रौप्यनगरीला नवा लूक प्राप्त होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. पुढील एक वर्षामध्ये शहरातील विकासकामात कोणतीही कसूर शिल्लक राहणार नाही, अशी माहिती नगराध्यक्षा जयश्री महावीर गाट यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

--------::--------

फोटो - नगराध्यक्षा जयश्री गाट