शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या ‘लवेश’ ची मोठी कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ही बाब जाणून देवकर पाणंदमधील लवेश विश्वजित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ही बाब जाणून देवकर पाणंदमधील लवेश विश्वजित बकरे या बारा वर्षीय मुलाने बांबू, काथ्या आणि गवताच्या कांड्यापासून अगदी हुबेहूब नैसर्गिक वाटावीत, अशी चिमण्यांसाठी घरटी बनविली आहेत. त्याने ही घरटी शनिवारी आपल्या वाढदिवसानिमित्त निसर्गप्रेमींना मोफत वाटली.

वाढते शहरीकरणामुळे चिमण्यांना आपल्यासह पिल्यांना घरटी बनविताना मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यात तौउतेसारख्या वादळामुळे तर अनेक घरटी आतमध्ये घातलेल्या अंड्यांसह खाली पडून खराब झाली. ही बाब छोट्या लवेशच्या मनाला लागली. त्याने गेल्या दोन ते तीन दिवसांत मनावर घेऊन अगदी हुबेहूब नैसर्गिक वाटावीत अशी बांबूपासून व गवताच्या वाळलेल्या काड्यापासून ५० घरटी बनविली. त्यातील काही स्वत: आसपासच्या झाडावर जाऊन मित्रांसोबत लावलीही. तर उरलेली घरटी त्याने शनिवारी आपल्या वाढदिवसानिमित्त ज्यांना आपल्या घराच चिमणीची घरटी हवी आहेत. अशा निसर्गप्रेमींनी ती मोफत वाटली.

पर्यावरणप्रेमी राकेश खत्री यांच्याकडून लवेशची दखल

लवेशच्या या कामगिरीची दखल शनिवारी सकाळी फेसबुकवरून लिम्का बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये नोंद असलेले दिल्लीतील पर्यावरणप्रेमी आणि नेस्ट मॅन ऑफ इंडिया म्हणून सर्वत्र ओळख असलेले राकेश खत्री यांनी घेतली. लवेशला फोन करून त्याच्या कामाचे कौतुक केले. ते चालवीत असलेल्या मोहिमेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. खत्री हे दिल्लीतून ही मोहीम चालवितात. तेही बांबू, ज्यूट आणि गवताच्या काड्यापासून अशी घरटी बनवून ती मोफत वाटतात. ही घरटी अनेकांनी घरामध्ये, इमारतीबाहेर लावली आहेत. त्या घरट्यांमध्ये चिमण्यांचा रहिवास वाढला आहे.

फोटो : २२०५२०२१-कोल-चिमणी०१

ओळी : कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये राहणाऱ्या बारा वर्षीय लवेश बकरे याने स्वत: बनविलेली चिमण्यांसाठीची घरटे झाडावर लावली.

फोटो : २२०५२०२१-कोल-चिमणी०२

ओळी : कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये राहणाऱ्या बारा वर्षीय लवेश बकरे याने बनविलेले चिमण्यांचे घरटे.

फोटो : २२०५२०२१-कोल-चिमणी०३

ओळी : बांबू, काथ्या आणि गवताच्या काड्यापासून बनविलेली चिमण्याच्या घरट्यांसोबत लवेश बकरे.