शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

सायकल खरेदी प्रकरण चिघळले

By admin | Updated: March 8, 2015 00:27 IST

राजकारण तापले : दोन ‘सभापतीं’चा ‘स्थायी’वर बहिष्कार; प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर नाराजी

कोल्हापूर : येथील जिल्हा परिषद स्वनिधीतून खरेदी करावयाच्या सायकल निविदेने घेण्याची प्रक्रिया सुरू केल्यामुळे महिला व बाल कल्याण सभापती ज्योती पाटील, समाज कल्याण सभापती किरण कांबळे यांनी शनिवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सायकल खरेदीच्या धुमसत असलेल्या वादाला तोंड फुटले. परिषदेतील स्व-निधीतून समाज कल्याण विभागाने सायकल खरेदीसाठी यंदा एक कोटी ७४ लाख, तर महिला व बाल कल्याण विभागाने एक कोटी २७ लाख रुपयांची तरतूद केली आहे. ‘महिला व बालकल्याण’ने शासनाचे दर करार आले नव्हते त्यावेळी चारवेळा निविदा काढली. मात्र, कोणत्याही कंपनीने निविदा भरली नाही. समाजकल्याणने दोनवेळा निविदा काढली. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, शासनाचे दर करार आले. त्यानंतर काही सदस्यांनी दर करारातील (आरसी) सायकलचा दर्जा चांगला नसून, नामांकित कंपन्यांची सायकल घ्यावी, असे सूचविले. यातून वाद सुरू झाला. दोन्ही समित्यांनी शासनाच्या नियमानुसार दर करारानुसार सायकल घेण्याचा ठराव केला. प्रक्रियाही सुरू केली. सभागृहात झालेल्या चर्चेनुसार अध्यक्ष, उपाध्यक्ष, दोन सभापती, दोन ज्येष्ठ सदस्य, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), मुख्य लेखाधिकारी यांची समिती स्थापन केली. समितीमधील दोन्ही सभापतींना बाजूला ठेवत निविदेने सायकल खरेदीचा निर्णय घेऊन अंमलबजावणी सुरू केली. त्यामुळे दोन्ही सभापती दुखावले. त्यांनी स्थायी समितीच्या बैठकीवर बहिष्कार घालून नाराजी उघड केली. आरसीनुसारच सायकल खरेदी झाली पाहिजे, यासाठी दोन्ही सभापतींनी फायली सीईओंकडे ‘पुटअप’ करण्याची सूचना दिली आहे. तशी प्रक्रिया सुरू झाली आहे. निविदा आणि आरसी यानुसार प्रक्रिया सुरू झाल्यामुळे प्रशासनाची कोंडी झाली आहे. निर्णय वादग्रस्त झाल्यामुळे दोन वर्षांपासून सायकलला लागलेला बे्रक यंदाही लागणार असल्याची शक्यता ठळक होत आहे.