म्हासुर्लीत विकासकामांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:19 IST2020-12-09T04:19:58+5:302020-12-09T04:19:58+5:30

म्हासुर्लीसह परिसरातील धनगर वसाहती आजही विकासापासून कोसो दूर असून येथे मूलभूत सुविधांची वानवा आहे. प्रा. पाटील यांच्या ...

Bhumipujan of development works in Mhasurli | म्हासुर्लीत विकासकामांचे भूमिपूजन

म्हासुर्लीत विकासकामांचे भूमिपूजन

म्हासुर्लीसह परिसरातील धनगर वसाहती आजही विकासापासून कोसो दूर असून येथे मूलभूत सुविधांची वानवा आहे. प्रा. पाटील यांच्या प्रयत्नांतून पालकमंत्री सतेज पाटील यांच्या निधीतून येथे सुमारे पंधरा लाख रुपये खर्चाचा रस्ता मंजूर झाला असून त्याच्या भूमिपूजन समारंभास भोगावतीचे माजी अध्यक्ष सदाशिव चरापले बिद्री कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष हिंदुराव चौगुले आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बबन धुंदरे, धनगर समाजाचे तालुका अध्यक्ष विठ्ठल मलगुंडे दूध संस्थेचे अध्यक्ष दगडू फाले, गंगाराम येडगे, सौ. मंगल धोंडिराम मलगुंडे यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक धोंडिराम मलगुंडे यांनी तर आभार सयाजी मलगुंडे यांनी मानले.

फोटो ओळी

मलगुंडे धनगरवाडा येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करताना ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील सोबत अन्य मान्यवर.

Web Title: Bhumipujan of development works in Mhasurli