शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

भुदरगड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचाराचा जोर शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 18:17 IST

Grampanchyat Electon Kolhapur-भुदरगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. राजकीय ज्वर शिगेला पोहचला आहे, प्रचंड इर्षा वाढलेली आहे.  उमेदवारांसह कार्यकर्त्यांच्यात शक्तिप्रदर्शन करून आपली ताकद दाखवण्यासाठी चढाओढ सुरू आहे.

ठळक मुद्देभुदरगड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचाराचा जोर शिगेलारॅलीने शक्ती प्रदर्शन,पदयात्राना उत

गारगोटी  :  भुदरगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. राजकीय ज्वर शिगेला पोहचला आहे, प्रचंड इर्षा वाढलेली आहे.  उमेदवारांसह कार्यकर्त्यांच्यात शक्तिप्रदर्शन करून आपली ताकद दाखवण्यासाठी चढाओढ सुरू आहे.तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतीपैकी पाचर्डे,वासणोली, पाटगाव, मुरुक्टे या चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित ४१ ग्रामपंचायतीसाठी  निवडणूक होत आहे. पक्षीय राजकारणाला तिलांजली देऊन सोयीच्या स्थानिक आघाड्या निर्माण झाल्या आहेत. शत्रुचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने आघाड्या बनलेल्या आहेत. उघड प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सकाळपासून पदयात्रा, रॅली काढून शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे.

अखेरच्या टप्प्यात साम, दाम,दंड,भेद या नीतीचा वापर सुरू असून पाहुण्यांचा पाहुणा शोधून मतपरिवर्तन करण्यात आहेत. प्रस्थापित नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. म्हसवे येथे तिरंगी लढत होत आहे.माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर येथे शिवसेनेचे बी.डी. भोपळे यांच्या रांगणा माऊली आघाडीच्या विरोधात भाजपचे सरचिटणीस प्रविणसिंह सावंत हे तळेमाऊली आघाडीच्या माध्यमातून भाजप,राष्ट्रवादी, काँग्रेस यांना सोबत घेऊन निकराचा लढा देत आहेत. गत पंचवार्षिक निवडणुकीत आमदार चंद्रकांत पाटील यांनी ग्रामपंचायत बिनविरोध केली होती.खानापूर बरोबरच गंगापूर, म्हसवे,नाधवडे,बसरेवाडी गावातील निवडणूक लक्षवेधी होणार असल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष या ग्रामपंचायतीच्या निकालाकडे लागलेले आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर