शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

‘भुदरगड’च्या मालमत्ता खरेदीदारांच्या अंगावर

By admin | Updated: September 2, 2015 00:04 IST

‘केडीसी’ ,‘भुदरगड’चे गुऱ्हाळ : बोजा उतरवण्याबाबत अडवणूक

राजाराम लोंढे- कोल्हापूर  -कर्जाची परतफेड झाली, मालमत्तेचा कब्जा मिळाला पण गेले अनेक वर्षे मालमत्तेवरील जिल्हा बँकेचा बोजाच उतरत नसल्याने भुदरगड नागरी पतसंस्थेच्या खरेदी केलेल्या २२ मालमत्ता अडचणीत सापडल्या आहेत. जिल्हा बँकेची थकीत रक्कम देण्यास ‘भुदरगड’चे अवसाय मंडळ तयार आहे, पण बँकेने व्याजासह संपूर्ण रक्कम भरण्याचा तगादा लागल्याने हा पेच निर्माण झाला आहे. ‘भुदरगड’ पतसंस्था अवसायनात काढली त्यावेळी पावणे दोन लाख ठेवीदार तर ४०६३ कर्जदार होते. ठेवी परत करण्यासाठी राज्य सरकारने अवसायक मंडळाला १५ कोटी ५० लाख रुपये दिले. उर्वरित ठेवीदारांचे पैसे थकीत कर्जाची वसुली व मालमत्ता विक्री करून देण्याचे आदेश आहेत. तारण मालमत्तांची विक्री व वसुलीची सुमारे २५ कोटींची रक्कम स्टेट बॅँकेत आहे. अवसायक मंडळाने पतसंस्थेच्या अनेक मालमत्तांची विक्री करून संबंधितांना ताबा दिला खरा पण त्यावरील जिल्हा बँकेच्या कर्जाचा बोजा अद्याप कमी झालेला नाही. ‘भुदरगड’ पतसंस्थेने जिल्हा बँकेकडून दहा कोटी कर्ज घेतले होते. त्यापैकी पतसंस्थेने ३ कोटी ८७ लाखांची परतफेड करूनही ९ कोटी २६ लाखांची थकबाकी दिसते पण प्रचलित व्याजदराने (बॅँकेच्या म्हणण्यानुसार) ही रक्कम २७ कोटी रुपये होते; पण अवसायक मंडळाची नियुक्ती झाल्यानंतर थकीत कर्जाला व्याज आकारता येत नसल्याने २००७ पर्यंत ही रक्कम १४ कोटी ४४ लाख रुपये होते. यापैकी ९ कोटी २६ लाख रुपये भरण्यास अवसायक मंडळ तयार आहे तसे त्यांनी बँकेचे प्रशासकांकडे प्रयत्नही केले होते, पण त्याला प्रशासकांनी प्रतिसाद दिला नाही. परिणामी ‘भुदरगड’च्या मालमत्ता खरेदी केलेले अडचणीत आले आहेत.न्यायालयाची परवानगी घेऊन आम्ही ‘भुदरगड’ची मालमत्ता खरेदी केली, त्याचे पैसे बॅँकेत भरूनही आमच्या मालमत्तेवरील बोजा कमी केला जात नाही. जिल्हा बॅँकेने ‘गायन क्लब’सारख्या सामाजिक संस्थेची अडवणूक करणे योग्य नाही. या विरोधात न्यायालयात दाद मागणार आहे. - व्ही. बी. पाटील,अध्यक्ष, गायन समाज देवल क्लबन्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अवसायक मंडळाचे कामकाज सुरू आहे. औपचारिकता म्हणून काही अटी घालून जिल्हा बँकेचे थकीत मुद्दल देण्यास तयार आहे, हे बॅँकेला मान्य नाही. याबाबत दोन दिवसांत आयुक्त कार्यालयात बैठक आहे. बँकेचे पैसे देऊन मालमत्तेवरील बोजा उतरवण्यासाठी प्रयत्नशील आहे. - राजेंद्र दराडे, अध्यक्ष, अवसायक मंडळ, भुदरगड पतसंस्था