भिडे स्पोर्टस, फुलेवाडीची प्रतिस्पर्धी संघावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:23 IST2021-03-18T04:23:25+5:302021-03-18T04:23:25+5:30

कोल्हापूर : ‘केडीसीए’तर्फे आयोजित केलेल्या वसंतराव चोगुले चषक ‘ब’ गट क्रिकेट स्पर्धेत भिडे स्पोर्टसने सिद्धेश्वर क्रिकेट अकॅडमीचा, तर ...

Bhide Sports, Phulewadi defeated the rival team | भिडे स्पोर्टस, फुलेवाडीची प्रतिस्पर्धी संघावर मात

भिडे स्पोर्टस, फुलेवाडीची प्रतिस्पर्धी संघावर मात

कोल्हापूर : ‘केडीसीए’तर्फे आयोजित केलेल्या वसंतराव चोगुले चषक ‘ब’ गट क्रिकेट स्पर्धेत भिडे स्पोर्टसने सिद्धेश्वर क्रिकेट अकॅडमीचा, तर दुसऱ्या सामन्यात फुलेवाडी क्रिकेट क्लबने शाहूपुरी जिमखाना ‘ब’ संघाचा पराभव केला.

कागल येथे बुधवारी झालेल्या सामन्यांत भिडे स्पोर्टस (ब)ने प्रथम फलंदाजी करताना ३०.३ षटकांत सर्वबाद १८२ धावा केल्या. यात अनिकेत हतकरने ६१, अवधूत पाटीलने २८, शरद पाटीलने १९, तौसिफ शेखने १२ व सुनील ओव्हळने नाबाद ११ धावा केल्या. सिद्धेश्वरकडून संभाजी घराळने ४, विजय लाडने ३, तनिष पाटीलने दोन व विशाल जमेनिकने एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना सिद्धेश्वर संघाला हे आव्हान पेलवले नाही. त्यांचा सर्व संघ २३.५ षटकांत सर्वबाद ९४ धावांत गुंडाळला. यात प्रवीण बानगेने २१, प्रवीण पाटीलने २० व तनिष पाटीलने १७ धावा केल्या. भिडे स्पोर्टसच्या गौरव मुळे, शरद पाटील यांच्या भेदक गोलंदाजीपुढे त्यांच्या टिकाव लागला नाही. जोडीला शरद पाटील व सौरभ माळी यांनीही तितक्याच जोमाने गोलंदाजी करीत विजयास हातभार लावला.

राजाराम कॉलेज मैदानावर झालेल्या दुसऱ्या सामन्यात शाहूपुरी जिमखाना संघाने ३९.४ षटकांत सर्वबाद १९९ धावा केल्या. मेहुल बुकशेठने नाबाद ७३, दिवाकर पाटीलने ३८, तन्मय खानवलकरने २५, शिवम कदमने १६, प्रतीक जमेनिकने १३ धावा केल्या. फुलेवाडी संघाकडून शरद राबाडे, अमोल पाटील, सुशांत साळोखे, स्वप्निल साळोखे यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. उत्तरादाखल खेळताना फुलेवाडी संघाने ३५.१ षटकांत ६ बाद २०३ धावा करीत विजयावर शिक्कामोर्तब केला. फुलेवाडीकडून अभिजित मोरेने ७७, धीरज नाईकने ४३, संजय पाटीलने नाबाद २४ धावा केल्या. गोलंदाजी करताना शाहूपुरीकडून अक्षय पवारने दोन, अविनाश कांबळे, श्रेयस देसाई, दिवाकर पाटील, पार्थ नागेशकरने प्रत्येकी एक बळी घेतला. मात्र, ते फुलेवाडी संघास विजयापासून रोखू शकले नाहीत.

Web Title: Bhide Sports, Phulewadi defeated the rival team