शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

भरतनाट्यम्, कथ्थकची जुगलबंदी

By admin | Updated: April 12, 2015 23:57 IST

उपज कलामंचचे आयोजन : कोल्हापूरकरांची संध्याकाळ नादमय

कोल्हापूर : भरतनाट्यम ही दाक्षिणात्य नृत्यशैली - विशेषत: हावभाव, मुद्रा आणि सर्वांगसुंदर प्रकार, तर कथ्थकमध्ये तबला, पढंतच्या तालावर पदन्यास... दोन्ही नृत्यशैलींचे स्वत:चे असे वैशिष्ट्य... परंपरा. पण ना श्रेष्ठतेचा अहंभाव, ना कनिष्ठतेचा न्यूनगंड... या भारतीय नृत्यशैलीला एकाच रंगमंचावर आणत नृत्यांगणा संयोगिता पाटील आणि नूपुर रावळ या दोन नृत्यांगनांनी कोल्हापूरकरांची संध्याकाळ नादमय केली. उपज कलामंचच्या वतीने गायन समाज देवल क्लबच्या रंगमंदिरात या संगीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी, उपज संस्थेचे प्रदीप कुलकर्णी, शोभा पाटील उपस्थित होत्या. यावेळी एकाच संगीतावर भरतनाट्यम् आणि कथ्थकचे फ्युजन सादर करून या नृत्यांगणांनी रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.कार्यक्रमाची सुरुवात संयोगिता व नूपुर यांनी ‘ओम नमो जी आद्या’ या गीतावरील नृत्याने केली. नूपुरने वंदना, राग-ताल, ठुमरी आणि गतभाव हे कथ्थकमधील नृत्य व तबल्यावरील जुगलबंदी सादर केली. संयोगिता पाटीलने तीन प्रकारचे देवरणाम आणि वर्णम ही पारंपरिक रचना सादर केली. कार्यक्रमाचा शेवट दोघींनी एकाच संगीतावर दोन्ही नृत्यांचे फ्युजन सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना गाण्यासाठी संपदा माने, पढंतसाठी उमा आळवेकर, तबल्यावर दीपक दाभाडे, व्हायोलिनवर अमित साळोखे यांनी साथसंगत केली. शरयू बनकर व आरती टोपले यांनी सूत्रसंचालन केले.