कोल्हापूर पोलीस दलाला बेस्ट टेक्नॉलॉजी अवॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:30 IST2021-09-17T04:30:57+5:302021-09-17T04:30:57+5:30

कोल्हापूर : नागरिकांना विविध ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या कोल्हापूर पोलीस दलाला पोलीस महासंचालक ...

Best Technology Award to Kolhapur Police Force | कोल्हापूर पोलीस दलाला बेस्ट टेक्नॉलॉजी अवॉर्ड

कोल्हापूर पोलीस दलाला बेस्ट टेक्नॉलॉजी अवॉर्ड

कोल्हापूर : नागरिकांना विविध ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या कोल्हापूर पोलीस दलाला पोलीस महासंचालक कार्यालयाकडून ‘बेस्ट टेक्नॉलॉजी अवाॅर्ड’ जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे यांनी ही माहिती दिली.

पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत राज्य पोलीस दलासाठी ‘सर्वोत्कृष्ट पोलीस घटक’ स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने राबवलेल्या विविध योजना आणि उपक्रमांची दखल घेण्यात आली आहे. उत्कृष्ट पोलीस दल, उत्कृष्ट तंत्रज्ञान, कम्युनिटी पोलिसिंग, सर्वोत्कृष्ट पोलीस दल असे पुरस्कार आहेत. तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पोलीस प्रशासन अद्ययावत केले. ‘क्यूआर कोड गस्त’ अहश्स्मार्ट पोलिसिंग करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. नागरिकांना तक्रार दाखल करण्यासाठी ऑनलाईन ॲप विकसित केले. या सर्व योजना आणि उपक्रमांची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Web Title: Best Technology Award to Kolhapur Police Force