शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

अल्प दरातील तपासणीचा लाखोंना लाभ

By admin | Updated: September 1, 2015 23:57 IST

‘विजय लॅबोरेटरी’चा उपक्रम : गुंदेशा कुटुंबीयांमुळे रुग्णांना दिलासा

 प्रदीप शिंदे -कोल्हापूर  आजारपणासाठी रुग्ण कोणत्याही परिस्थितीत पैसे खर्च करतात, ही मानसिकता ओळखून रुग्णालयात दाखल होताच ताबडतोब रक्त, लघवी अशा किमान पाच-सहा तपासण्या करण्यास सांगितल्या जातातच. आजाराचे गांभीर्य पाहून त्यापुढील इतर विशिष्ट तपासण्या वेगळ्याच. या प्रत्येक तपासणीचे दर पाहून तिथेच रुग्ण व नातेवाईक निम्मे गार होतात. यातूनच सर्वसामान्यांची ‘आजाराचे निदानच राहू दे,’ अशी मानसिकता होते. अशा रुग्णांसाठी अल्पदरांत विविध चाचण्या करण्याकरिता कोल्हापुरातील ‘विजय पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी’ ही नवसंजीवनी ठरत आहे. कोल्हापुरातील प्रतिभानगर परिसरातील गुंदेशा कुटुंबीय सराफ व्यावसायिक आहे. आपल्या उत्पन्नामधून समाजासाठी काही खर्च करावा, ही भावना डोळ्यांपुढे ठेवून स्व. भीमराज गुंदेशा यांनी १९८२ साली ‘संघवी भीमराज गुंदेशा चॅरिटेबल ट्रस्ट’ सुरू केले. त्यामार्फत ते विविध रुग्णांच्या शस्त्रक्रियांसाठी आर्थिक मदत करीत होते. यावेळी असे निदर्शनास आले की, विविध आजारांचे निदान करण्यासाठी ज्या तपासण्या केल्या जातात, त्या आपण अल्पदरात रुग्णांना उपलब्ध करून दिल्यास अनेकांना फायदा होईल. या उद्देशाने आठ वर्षांपूर्वी स्व. शांतीलाल गुंदेशा यांनी आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ २००६ साली ‘विजया पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी’ सुरू केली. येथे विविध ५० चाचण्या अत्यंत अल्पदरात करून देण्यास सुरुवात केली. येथे विविध चाचण्यांचे दर दहा रुपयांपासून पुढे आहेत. यामुळे पाहता-पाहता या उपक्रमाला खूप प्रतिसाद मिळू लागला. गेल्या आठ वर्षांत सुमारे एक लाखाहून अधिक रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. फक्त कोल्हापूर शहरवासीयच याचा लाभ घेतात असे नाही, तर निपाणी, कागलसह शहरालगतच्या अनेक भागांतून रुग्ण येथे येतात. आता हा उपक्रम त्यांचे पुत्र अजित व सुनील गुंदेशा चालवीत आहेत. लॅबमध्ये सॅम माजगावकर, अमित गोडबोले, सोनाली पोवार हे काम पाहतात. सामाजिक बांधीलकीचे धडे आम्हाला आमच्या कुटुंबीयांकडून मिळाले आहेत. लोकांना मदत केल्याने एक वेगळेच समाधान मिळते. आमचा स्टाफही सेवाभावी वृत्तीनेच या ठिकाणी काम करतो. आतापर्यंत साधारण एक लाख रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. - अजित गुंदेशाअसा आहे पत्ताविजया पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी, प्लॉट नं. ४, महावीरनगर, प्रतिभानगरजवळ. सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत ही लॅब खुली असते. त्यानंतर सायंकाळी ५.३० ते ६.३० पर्यंत रिपोर्ट दिला जातो.येथे या तपासण्या होतातमलेरिया, मधुमेह, लघवीचे परीक्षण, रक्तगट, रक्त गोठणे, रक्ताचे प्रमाण, थुंकी, शौचपरीक्षण, किडनीसाठी परीक्षण, लिव्हर, संधिवात, शरीरातील क्षार, कॅल्शियम, कावीळ, प्रेग्नन्सी टेस्ट, वीर्य तपासणी, चरबी, प्रोटीनची तपासणी, टायफॉईड, गुप्तरोग, संपूर्ण रक्तघटकांचे प्रमाण, स्वादुपिंडाची तपासणी, हृदयविकार, शरीरातील क्षार, रक्त घट्ट, पातळ, एचआयव्ही, हिपॅटायटिस बी, प्रोस्टेट ग्रंथी, स्नायूदुखी, थायरॉईड ग्रंथी, मलेरिया, हॉर्मोन, चिकन गुनिया, पीएसए, आदी रोगांच्या याठिकाणी तपासण्या केल्या जातात.