दिव्यांग व्यक्तीच्या संघटित ताकदीच्या बळावर योजनेचा लाभ मिळतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:25 IST2021-04-27T04:25:09+5:302021-04-27T04:25:09+5:30

आंबेवाडी (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीतर्फ गावातील दिव्यांग व्यक्तींना प्रत्येकी ५ हजार ३२५ रुपये धनादेशाचे ...

The benefit of the scheme is based on the organized strength of the disabled person | दिव्यांग व्यक्तीच्या संघटित ताकदीच्या बळावर योजनेचा लाभ मिळतो

दिव्यांग व्यक्तीच्या संघटित ताकदीच्या बळावर योजनेचा लाभ मिळतो

आंबेवाडी (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीतर्फ गावातील दिव्यांग व्यक्तींना प्रत्येकी ५ हजार ३२५ रुपये धनादेशाचे वाटप कार्यक्रमात सुभेदार बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सिंकदर मुजावर होते

देशभरातील दिव्यांग लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या योजना या नवी संजीवनी देणाऱ्या आहेत, असेही सुभेदार यांनी आपल्या भाषणात नमूद केले आहे.

यावेळी सरपंच सिंकदर मुजावर, ग्रामसेविका मिनाज नदाफ, उपसरपंच वेदा अतितकर, ग्रामपंचायत सदस्य तेजस सुतार, भारत गायकवाड, सुजय काटकर, आदींची भाषणे झाली. प्रारंभी नंदा शिपेकर यांनी प्रास्ताविक केले. शेवटी शिवाजी चौगुले यांनी आभार मानले. सोशल डिस्टन्सचे नियम पाळून कार्यक्रमास दिव्यांग बांधव उपस्थित होते.

Web Title: The benefit of the scheme is based on the organized strength of the disabled person