शहरं
Join us  
Trending Stories
1
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
2
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
3
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
4
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
5
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
6
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
7
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
8
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
9
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
10
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
11
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
12
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
14
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
15
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
16
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
17
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
18
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
19
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ आता दोघांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 13:27 IST

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या वहिती खातेधारक शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांपैकी एकास आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. कृषी विभागाने त्यासंबंधीचा शासन आदेश शनिवारी काढला आहे. राज्यात सुमारे १ कोटी ५२ लाख खातेदार शेतकरी असून त्याच्या दुप्पट (३ कोटी ४ लाख) लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल. शेतकऱ्याला स्वत:शिवाय अन्य कुणाला या योजनेचा लाभ द्यायचा. त्याचे नाव योजनेसाठी (नॉमिनीप्रमाणे) अगोदर सुचवावे लागेल.

ठळक मुद्देशेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ आता दोघांनाशासनाचा निर्णय : कुटुंबातील खातेदार नसलेल्या एकास लाभ

विश्वास पाटील 

कोल्हापूर : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या वहिती खातेधारक शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांपैकी एकास आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. कृषी विभागाने त्यासंबंधीचा शासन आदेश शनिवारी काढला आहे.

राज्यात सुमारे १ कोटी ५२ लाख खातेदार शेतकरी असून त्याच्या दुप्पट (३ कोटी ४ लाख) लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल. शेतकऱ्याला स्वत:शिवाय अन्य कुणाला या योजनेचा लाभ द्यायचा. त्याचे नाव योजनेसाठी (नॉमिनीप्रमाणे) अगोदर सुचवावे लागेल.

शेती करताना होणारे अपघात किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना कायमचे अपंगत्व येते. कर्त्या व्यक्तीस अपघात झाल्याने कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते. अशा कुटुंबांना लाभ देण्यासाठी राज्य शासनातर्फे ही मूळ योजना २००४ पासून राबविण्यात येत अहे.

योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यास २ लाख रकमेचे विमा संरक्षण दिले जाते; परंतु आतापर्यंत एकट्या शेतकऱ्यालाच या योजनेचा लाभ मिळत होता. त्यामुळे योजनेचा लाभ कुटुंबियांनाही मिळावा, अशी मागणी खूप दिवसांपासून सुरू होती.

कशासाठी मिळणार विमा संरक्षण

वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात.

कुणाला मिळणार संरक्षण

राज्यातील १ कोटी ५२ लाख खातेदार शेतकरी व खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य त्यामध्ये आई-वडील,पती-पत्नी मुलगा किंवा अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती.

वयाची अट

१० ते ७५ वयोगटांतील कोणत्याही व्यक्तीस शिवाय प्रत्येक दिवसाच्या २४ तासांसाठी योजना लागू राहील.

किती मिळणार भरपाई

  • मृत्यू झाल्यास २ लाख, दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय किंवा एकाचवेळी एक हात
  •  एक पाय व एक डोळा निकामी झाल्यासही २ लाख मिळणार
  • एक डोळा, एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास १ लाख रुपये मिळणार


विमा हप्त्याचे काय

योजनेंतर्गत शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही विमा कंपनीकडे स्वतंत्ररित्या विमा हप्ता भरण्याची गरज नाही. ही संपूर्ण रक्कम शासनामार्फत विमा कंपनीकडे भरली जाईल. शेतकऱ्यांने स्वतंत्रपणे अन्य कोणत्याही विमा योजनेचे संरक्षण जरी घेतले असले तरी त्याचा योजनेशी काही संबंध नाही. या योजनेंतर्गत मिळणारे लाभ स्वतंत्रच असेल.

टॅग्स :Gopinath Mundeगोपीनाथ मुंडेAccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्रkolhapurकोल्हापूर