Kolhapur: शिवाजी विद्यापीठात मधमाशांचे मोहळ उठले, हल्ल्यात पाचजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 16:18 IST2025-10-08T16:17:10+5:302025-10-08T16:18:38+5:30

सोनचाफ्याच्या फुलामुळेच हल्ला

Bees swarm Shivaji University Kolhapur five injured in attack | Kolhapur: शिवाजी विद्यापीठात मधमाशांचे मोहळ उठले, हल्ल्यात पाचजण जखमी

Kolhapur: शिवाजी विद्यापीठात मधमाशांचे मोहळ उठले, हल्ल्यात पाचजण जखमी

कोल्हापूर : वार मंगळवार..वेळ सकाळी १० ची..स्थळ शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीचे प्रवेशद्वार..विद्यापीठातीलच एक महिला कर्मचारी मुख्य इमारतीत प्रवेश करताना याच इमारतीच्या भिंतीवरील मधमाशांनी अचानक संबंधित महिला कर्मचाऱ्यांवर हल्ला केला अन् एकच धावपळ उडाली. त्या महिला कर्मचाऱ्यास वाचविण्यासाठी धावलेल्या तिच्या पतीसह विद्यापीठातील आणखी तिघा कर्मचाऱ्यांनाही मधमाशांनी हल्ला करून जखमी केले. 

अचानक मधमाशांचे मोहोळ उठल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कुलसचिवांसह विद्यापीठातील उपस्थित सर्वच कर्मचाऱ्यांनी खिडक्यांचे पडदे टाकून संबंधित महिला व इतर कर्मचाऱ्यांना मधमाशांपासून वाचविण्याचा प्रयत्न केला. अगदी दहा-पंधरा मिनिटांच्या या थराराने विद्यापीठातील मंगळवारची सकाळ भीतीच्या छायेने दाटून गेली.

शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या पिछाडीस मधमाशांचे पोळ बसले आहे. मंगळवारी सकाळी प्रशासकीय कर्मचारी मुख्य इमारतीत प्रवेश करत असताना अचानक मधमाशांचे पोळ उठून मधमाशांनी एका महिला कर्मचाऱ्यावर हल्ला केला. यावेळी तेथे उपस्थित महिलेच्या पतीसह दोन सुरक्षारक्षक व एका कर्मचाऱ्याने महिलेला वाचवण्यासाठी धाव घेतली. यात मधमाशांनी उर्वरित चौघांनाही चावा घेऊन जखमी केले. त्यांना तत्काळ विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील एकाला जास्त प्रमाणात मधमाशा चावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले.

सोनचाफ्याच्या फुलामुळेच हल्ला

सोनचाफ्याची फुले मधमाशांना आकर्षित करतात. मधमाशांना सोनचाफ्याचा वास लगेच येतो. हा हल्ला झाला त्यावेळी संबंधित कर्मचारी महिलेच्या हातात सोनचाफा होता असे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.

Web Title : कोल्हापुर विश्वविद्यालय में मधुमक्खी का हमला: कर्मचारी को बचाने में पांच घायल

Web Summary : शिवाजी विश्वविद्यालय, कोल्हापुर में मधुमक्खी के झुंड के हमले में एक कर्मचारी और बचाव दल सहित पांच लोग घायल हो गए। एक चंपा के फूल ने मधुमक्खियों को आकर्षित किया होगा। एक पीड़ित को उन्नत देखभाल की आवश्यकता थी।

Web Title : Kolhapur University Bee Attack: Five Injured Rescuing Employee

Web Summary : Bee swarm attacks at Shivaji University, Kolhapur, injured five, including an employee and rescuers. A Tiare flower may have attracted the bees. One victim required advanced care.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.