शाहू विद्यालयाची ‘नूतन मराठी’ वर मात

By Admin | Updated: December 19, 2014 23:51 IST2014-12-19T23:38:53+5:302014-12-19T23:51:05+5:30

तात्यासाहेब सरनोबत स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धा

Beat Shahu Vidyalaya on 'Nutan Marathi' | शाहू विद्यालयाची ‘नूतन मराठी’ वर मात

शाहू विद्यालयाची ‘नूतन मराठी’ वर मात

कोल्हापूर : छत्रपती शाहू विद्यालय संघाने नूतन मराठी हायस्कूलचा तब्बल १६२ धावांनी पराभव करीत तात्यासाहेब सरनोबत स्मृतिचषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेची पुढील फेरी गाठली. सामन्यात सिद्धेश देशमुखची शतकी खेळी ही विशेष ठरली.
शाहू स्टेडियम येथे आज, शुक्रवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना छत्रपती शाहू विद्यालयाने २९ षटकांत ५ बाद १९४ धावा केल्या. यामध्ये सिद्धेश देशमुख याने १०० धावा केल्या. त्याला अर्षन बांगेने ३७ धावा करीत मोलाची साथ दिली. नूतन मराठी हायस्कूलकडून गोलंदाजी करताना हृषिकेश दिवसे व जयीद डंगीर यानी प्रत्येकी दोन बळी घेतले.
उत्तरादाखल खेळताना नूतन मराठी हायस्कूलचा डाव ८ षटकांत सर्वबाद केवळ ३२ धावांत संपला. यामुळे नूतन मराठीला तब्बल १६२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. छत्रपती शाहूकडून तेजसिंह माने व वरद मुसळे या दोघांनी प्रत्येकी चार बळी घेत मोलाची कामगिरी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Beat Shahu Vidyalaya on 'Nutan Marathi'