शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘जिल्हा परिषदे’साठी सज्ज रहा

By admin | Updated: June 11, 2015 00:43 IST

बी. एन. पाटील : राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन कार्यक्रम

कोल्हापूर : जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत व सक्षम करून आगामी जिल्हा परिषदेसह सर्वच पंचायत समित्यांवर पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य बी. एन. पाटील-मुगळीकर यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या १६ व्या वर्धापनदिनानिमित्त ताराबाई पार्क येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी ध्वजाचे अनावरण बी. एन. पाटील यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबूराव हजारे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.स्वागत व प्रास्ताविकात जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे म्हणाले, स्वाभिमानातून १६ वर्षांपूर्वी पक्षाध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. हा स्वाभिमान बाळगून कार्यकर्त्यांनी आजपर्यंत वाटचाल केल्याने राष्ट्रवादी जिल्ह्यात नंबर वनचा पक्ष झाला आहे. पक्ष वाढीबरोबर केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या कारभाराविरोधात जनतेबरोबर राहण्याची जबाबदारीही आपल्यावर आली आहे. ही जबाबदारी कार्यकर्त्यांना उचलावी लागणार आहे. तसेच जनतेच्या विविध प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून त्यांना न्याय देण्याची भूमिका कार्यकर्त्यांना घ्यावी लागणार आहे. जिल्हा बॅँकेचे संचालक भैया माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष धैर्यशील पाटील-कौलवकर, भूविकास बॅँकेचे माजी अध्यक्ष युवराज पाटील, महिला जिल्हाध्यक्षा संगीता खाडे, पंडितराव केणे, प्रकाश पाटील, नेताजी मोरे, डी. बी. पाटील, प्रा. किसन चौगले, हंबीरराव पाटील, आप्पासाहेब धनवडे, प्रदीप पाटील, संतोष धुमाळ, पूनम मगदूम, एम. जे. पाटील, सुनील साळोखे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. माजी पंचायत समिती सदस्य मधुकर जांभळे यांनी आभार मानले. ( प्रतिनिधी )