शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Mahotsav -खराब रस्त्याचे प्रतिबिंब देखाव्यामध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 12:50 IST

कोल्हापुरातील खराब रस्त्याचे प्रतिबिंब यंदाच्या गणेशोत्सवात दिसत आहे. बेलबाग येथील रहिवाशी नितीन विनायक मिरजकर यांनी घरातील गणेशमूर्तीसमोर फायबरचा फिरता रोड रोलर तयार करून खराब रस्त्यावर खडीकरण सुरू असल्याचा देखावा केला आहे.

ठळक मुद्देखराब रस्त्याचे प्रतिबिंब देखाव्यामध्येनितीन मिरजकर यांचा फिरता रोड रोलर

संदीप आडनाईक

कोल्हापूर : कोल्हापुरातील खराब रस्त्याचे प्रतिबिंब यंदाच्या गणेशोत्सवात दिसत आहे. बेलबाग येथील रहिवाशी नितीन विनायक मिरजकर यांनी घरातील गणेशमूर्तीसमोर फायबरचा फिरता रोड रोलर तयार करून खराब रस्त्यावर खडीकरण सुरू असल्याचा देखावा केला आहे.मेकॅनिक डिप्लोमाचे शिक्षण घेतलेले नितिन मिरजकर हे कळंबा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत फीटर ट्रेडसाठी शिक्षक आहेत. दरवर्षी ते घरातील गणपतीसमोर वेगवेगळे तांत्रिक देखावे केवळ हौसेसाठी तयार करत असतात. पावसामुळे कोल्हापुरातील रस्ते खराब झाल्याचे प्रतिबिंब यावेळच्या देखाव्यात दाखविण्याचे त्यांनी ठरविले.फॅब्रिकेशन आणि बायोफोमच्या साहाय्याने त्यांनी फिरता रोड रोलर तयार केला. गेले १५ दिवस यासाठी ते परिश्रम घेत होते. घरातील गणेशमूर्तीसमोर यांनी हा तांत्रिक देखावा उभारला आहे. खड्ड्यावर पसरलेली खडी रोड रोलरने फिरवत रस्ता दुरुस्त करण्यात येत असल्याचा हा देखावा पाहण्यासाठी त्यांच्या घरी अनेकजण गर्दी करत आहेत.पन्नाशीत असलेल्या मिरजकर यांना या देखाव्यासाठी त्यांचा मुलगा शुभम मदत करत होता. तो न्यू पॉलिटेक्निक येथे आॅटोमोबाईलच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. घरी वृद्ध आई आणि पत्नी आहे. बेळगाव येथे वडील नोकरीस असताना मिरजकर यांचेही शिक्षण तेथे झाले. त्यांनी काही काळ बेळगाव येथे खासगी कंपनीत नोकरीही केली. सरकारी नोकरीनंतर ते १९९९ नंतर कोल्हापुरात स्थायिक आहेत.मिरजकर दरवर्षी गणेशोत्सवात विविध तांत्रिक देखावे घरीच तयार करत असतात. एअर बलून, वोक्सवॅगनची कार, फुलपाखरू, नारळ, महादेवाची पिंडी असे अनेक तांत्रिक देखावे त्यांनी यापूर्वी तयार केले आहेत. घरगुती गणपतीचे विसर्जन होईपर्यंत हा देखावा खुला आहे. 

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर