शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू हलवाई यांचे नाव मतदार यादीतून गायब

By admin | Updated: March 12, 2015 00:08 IST

तरुण भारत मंडळ निवडणूक

सांगली : तरुण भारत व्यायाम मंडळाचे माजी अध्यक्ष व राष्ट्रीय कबड्डीपटू गोपालन गणपती हलवाई (बच्चूभाई हलवाई) यांचे नाव मंडळाने नुकत्याच प्रसिध्द केलेल्या सभासद मतदार यादीतून वगळले आहे. या प्रकारामुळे दोन्ही गटातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. मंडळाच्या आजी-माजी खेळाडूंनी निषेध सभा घेऊन व रंगपंचमी न खेळता निषेध व्यक्त केला. बच्चूभाई हलवाई हे मंडळाचे राष्ट्रीय कबड्डीपटू. बच्चूभार्इंची मैदानावर एन्ट्री पडली की भल्याभल्यांच्या उरात धडकी भरायची, असा एक काळ होता. विद्यमान संचालक मंडळाने निवडणुकीसाठी नुकतीच सभासद यादी प्रसिध्द केली. या यादीतून चक्क बच्चूभार्इंचे नावच वगळले होते. मंडळाचे माजी अध्यक्ष असलेल्या एका ज्येष्ठ आणि वयस्कर सभासदास अशी वागणूक देणं कितपत योग्य आहे? असा सवाल मंडळाच्या काही सभासद कबड्डीपटूंनी मंडळाच्या कार्यालयात जाऊन विचारला. प्रकरण अंगलट येईल या भीतीने पुन्हा त्वरित बच्चूभार्इंचे नाव यादीत समाविष्ट करण्यात आले. या प्रकाराबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी मंडळाच्या आजी-माजी खेळाडूंची निषेध सभा दीपकराव साठे यांच्या गणपती पेठेतील कार्यालयात पार पडली. सभेत खेळाडूंनी आपले मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय कबड्डीपटू भरत ताटे म्हणाले, मंडळाचे विद्यमान पदाधिकारी इतक्या खालच्या पातळीला जातील, असं कधीच वाटलं नाही. कबड्डीचे भीष्माचार्य म्हणून ज्यांची देशभर ख्याती आहे, त्या गुरूवर्य बच्चूभार्इंच्याबाबतीत हे कारस्थान करणं चुकीचं आहे. विनायक विभूते म्हणाले, सच्च्या खेळाडूंची कदरच केली जात नाही. या सभेस भारतश्री रवींद्र आरते, अशोक शेट्टी, अमर गोटखिंडे, राहुल गोरे, अमर रजपूत, पुंडलिक चव्हाण, गणेश जाधव, किरण मोहिते, बापू चव्हाण, बसू स्वामी, अनिल चव्हाण, काका हलवाई, अरुण शेटे, उदय खोत, खंडेराव हलवाई, दिगंबर गायकवाड, भरत ताटे, हमीद शिकलगार, विदूर हलवाई आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)