शहर वाहतूक शाखेने उभारला प्रबोधनात्मक फलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:25 IST2021-01-20T04:25:22+5:302021-01-20T04:25:22+5:30
कोल्हापूर : रस्ता सुरक्षा अभियानाला शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने मंगळवारपासून प्रारंभ करण्यात आला. पोलीस अधीक्षक कार्यालय चौकात ‘नियम पाळा’ ...

शहर वाहतूक शाखेने उभारला प्रबोधनात्मक फलक
कोल्हापूर : रस्ता सुरक्षा अभियानाला शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने मंगळवारपासून प्रारंभ करण्यात आला. पोलीस अधीक्षक कार्यालय चौकात ‘नियम पाळा’ असा प्रबोधनात्मक फलक उभारण्यात आला आहे. या फलकाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी स्टिव्हन अ्ल्वारिस, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पो. नि. स्नेहा गिरी आदी उपस्थित होते.
महिनाभर चालणाऱ्या या अभियानामध्ये नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत प्रबोधन, माहितीपत्रकांचे वाटप, शाळा-महाविद्यालयात विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देणे, अवजड वाहनचालकांची नेत्र तपासणी, प्रमुख चौकांत सूचना फलकांचे अनावरण असे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. आज, बुधवारी नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना गांधीगीरी पध्दतीने पुष्प देऊन त्याचे प्रबोधन करण्यात येणार आहे, अशी माहिती शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी सांगितले.
फोटो नं. १९०१२०२१-कोल-पोलीस बोर्ड
ओळ : शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियानअंतगर्त पोलीस अधीक्षक कार्यालय चौकात मंगळवारी प्रबोधनात्मक फलक उभारण्यात आला.