नाना अग्निहोत्री यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:24 IST2021-09-11T04:24:29+5:302021-09-11T04:24:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : येथील ब्राह्मण सभेच्यावतीने गजानन मोरेश्वर तथा नाना अग्निहोत्री गुरुजी यांना शंकराचार्य विद्यानृसिंह भारती ...

Awarding ‘Lifetime Achievement’ Award to Nana Agnihotri; | नाना अग्निहोत्री यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान;

नाना अग्निहोत्री यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान;

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : येथील ब्राह्मण सभेच्यावतीने गजानन मोरेश्वर तथा नाना अग्निहोत्री गुरुजी यांना शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्याहस्ते ‘वैदिक जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अशोक धर्माधिकारी आणि सीए महेश धर्माधिकारी यांनी त्यांचे पिताश्री वेदशास्त्रसंपन्न कै. मल्लारी विष्णू ऊर्फ बंडोपंत धर्माधिकारी यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार सुरू केला आहे. प्रमुख पाहुणे म्हणून प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मदन कुलकर्णी उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांचा परिचय ॲड. विवेक शुक्ल यांनी करून दिला. मानवी आयुष्यात येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी वेद आणि विज्ञान एकत्रितपणे कार्यरत राहिले पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी विद्यानृसिंह भारती यांनी व्यक्त केली. सभेचे अध्यक्ष नंदकुमार मराठे यांनी प्रास्ताविक केले. संचालक डॉ. उदय कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यवाह श्रीकांत लिमये यांनी सूत्रसंचालन केले. दीपक भागवत यांच्या पसायदानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी संस्थेचे संचालक रामचंद्र पुरोहित, अनुराधा गोसावी, महालक्ष्मी बॅंकेचे संचालक उदय महेकर, अरुणा धर्माधिकारी, मंदार धर्माधिकारी, रमेश सखदेव, संस्थेचे व्यवस्थापक अशोक जोशी, श्रीकात नांगनूरकर , स्वप्निल जोशी उपस्थित होते.

१००९२०२१ कोल ब्राह्मण सभा

ब्राह्मण सभा करवीरतर्फे नाना अग्निहोत्री यांना शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्याहस्ते ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Awarding ‘Lifetime Achievement’ Award to Nana Agnihotri;