शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ऑटो रिक्षा टॅक्सी होणार नाहीत स्क्रॅप- - डॉ. स्टीव्हन अल्वारिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 20:38 IST

जिल्हाधिकारी अध्यक्ष, पोलीस अधीक्षक सदस्य व प्रादेशिक परिवहन अधिकारी सदस्य सचिव असणाऱ्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समितीने या सर्वांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या निर्णयाला एक वर्षाची मुदतवाढ दिल्याने ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांना दिलासा दिला आहे. आता ही मर्यादा 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

ठळक मुद्देऑटो रिक्षा टॅक्सी होणार नाहीत स्क्रॅप ; वर्षाची मुदत वाढ

कोल्हापूर : पेट्रोल-डिझेल ऑटोरिक्षा 16 वर्षे, एलपीजी ऑटोरिक्षा 18 वर्षे व टॅक्सी 20 वर्षे अशी वयोमर्यादा यापूर्वी राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकारणाने निश्चित केली होती. त्यानुसार ही मुदत 31 मार्च 2020 रोजी संपली होती. त्यामुळे ही वाहने स्क्रॅप करावी लागणार होती. या वाहनांना 1 वर्षाची म्हणजे 31 मार्च 2021 पर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षते खाली आणि पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी दिली.राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने यापूर्वी निश्चित केलेल्या वयोमर्यादे नुसार 2823 पेट्रोलच्या, 396 डिझेलच्या, 2128 एलपीजीच्या रिक्षा अशा एकूण 5347 ऑटो रिक्षा त्याचप्रमाणे 13 पेट्रोल टॅक्सी, 112 डिझेल टॅक्सी, 61 एलपीजी टॅक्सी अशा एकूण एकूण 180 टॅक्सींची वयोमर्यादा 31 मार्च 2020 ला संपल्यामुळे सर्वांना वाहने स्क्रॅप करावी लागणार होती. बऱ्याच ऑटोरिक्षा संघटनांनी याबाबत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे मुदत वाढवून मिळण्याबाबत विनंती केली होती.कोरोना पार्श्वभूमीवर ऑटो चालकांवर ओढवलेले संकट पाहता ऑटो रिक्षा स्क्रॅप करून दुसरे मोठे संकट त्यांच्यावर ओढवणार होते. जिल्हाधिकारी अध्यक्ष, पोलीस अधीक्षक सदस्य व प्रादेशिक परिवहन अधिकारी सदस्य सचिव असणाऱ्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समितीने या सर्वांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या निर्णयाला एक वर्षाची मुदतवाढ दिल्याने ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांना दिलासा दिला आहे. आता ही मर्यादा 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRto officeआरटीओ ऑफीस