शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हा रुग्णालयावर हल्लाबोल

By admin | Updated: June 2, 2015 01:27 IST

गडहिंग्लजमध्ये ‘मनसे’चे आंदोलन : रुग्णांच्या हेळसांडप्रकरणी अधीक्षकांची खुर्ची पेटविली

गडहिंग्लज : डॉक्टरांच्या अनियमित वेळा, रुग्णांची हेळसांड, स्वच्छतेचा अभाव, कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार, आदी अनेक कारणास्तव येथील ‘मनसे’च्या कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रुग्णालयावर हल्लाबोल केला. अधीक्षक डॉ. सुनील कुरुंदवाडे यांची खुर्ची बाहेर आणून पेटवत त्यांना रुग्णालयातून जाण्यास भाग पाडले. गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यांतील सर्वसामान्य जनतेसाठी ‘आरोग्यदायिनी’ असणारे येथील उपजिल्हा रुग्णालय गेल्या अनेक वर्षांपासून समस्येंच्या गर्तेत सापडले आहे. विविध पक्ष आणि संघटनांकडून अनेकदा आंदोलने होऊनही रुग्णालयाच्या कारभारात कोणताही फरक पडला नाही. तक्रारींचा जाब विचारण्यासाठी मनसे तालुकाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी सकाळी अकराच्या सुमारास रुग्णालय गाठले. रुग्णांच्या बेडवर बेडशीट्स नाहीत, रुग्णालयातील स्वछतागृहे तसेच आवार अस्वच्छ आहे, बहुतांश डॉक्टर जाग्यावर नाहीत, आदी अनेक कारणांचा जाब कार्यकर्त्यांनी डॉ. कुरुंदवाडे यांना विचारला. त्यांनी समर्पक उत्तर न दिल्याने त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तसेच कुरुंदवाडे यांना तुम्ही या खुर्चीवर काम करण्यास लायक नसल्याचे सांगत त्यांची खुर्ची बाहेर आणून पेटवून देण्यात आली. रुग्णालयाच्या भोंगळ कारभारास तुम्हीच जबाबदार असल्याचे सांगून कार्यकर्त्यांनी डॉ. कुरुंदवाडे यांना रुग्णालयातून जाण्यास भाग पाडले. तसेच परत आल्यास मोडतोड करण्याचा इशारा देण्यात आला. (वार्ताहर)