शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्यांचे दफ्तर अद्ययावत

By admin | Updated: August 30, 2015 00:46 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे गौरवोद्गार : पोलीस व समाजकल्याण विभागाचे योग्य समन्वय

कोल्हापूर : समाजकल्याण विभाग व पोलीस विभागाचा समन्वय चांगला असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्यांचे दफ्तर अद्ययावत आहे, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी काढले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक झाली. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विजयकुमार गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सैनी यांनी एप्रिल ते जुलै २०१५ अखेर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ अंतर्गत दाखल झालेल्या प्रकरणाचा आढावा व सद्य:स्थितीची माहिती घेतली. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, फिर्यादी व साक्षीदार फितूर झाल्यामुळे आरोपी निर्दोष सुटतात. गुन्ह्याचा अहवाल तत्काळ दिल्यास प्रकरण प्रलंबित न राहता पीडितांना लवकर अनुदान मंजूर करता येईल. यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करावा. जून २०१५ अखेर अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत १९७ व नागरी हक्क संरक्षण अधिनियमांतर्गत ३५ अशी २३२ प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले. अन्याय अत्याचारग्रस्त १२ व्यक्तींना आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले. अत्याचाराची २५ प्रकरणे, पोलीस तपासावरील ९ प्रलंबित प्रकरणे, पोलीस तपास पूर्ण झालेली परंतू अर्थसहाय्यासाठी प्रलंबित असलेली २९ प्रकरणे, अत्याचारित व्यक्तींना अर्थसहाय्य मंजुरीची २५ प्रकरणे, अशा एप्रिल २०१५ ते जुलै २०१५ अखेर ९८ गुन्ह्यांचा सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला. सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांनी दर महिन्याला अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली कोर्टात सुरू असलेली प्रकरणे, निकाल लागलेली प्रकरणे याबाबतची माहिती सभेमध्ये सादर करावी, अशी सूचना करण्यात आली. (प्रतिनिधी)