शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून ढोलगरवाडीच्या तरुणीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:22 IST

चंदगड : ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील एका विवाहित तरुणीकडून सहा लाख रुपये घेऊन नोकरीचे व लग्नाचे आमिष दाखवून पीडित ...

चंदगड : ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील एका विवाहित तरुणीकडून सहा लाख रुपये घेऊन नोकरीचे व लग्नाचे आमिष दाखवून पीडित तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी अनिल जोतिबा तळगूळकर (वय ३२, रा. मांडेदुर्ग) याच्यासह भरत सुबराव गावडे (४२, रा. आसगाव), महेश शहापूरकर (३५, रा. मांडेदुर्ग), उदय संतू पाटील (२८, रा. बसर्गे), बाबू शहापूरकर (३०, रा. मांडेदुर्ग), विश्वनाथ ओऊळकर (३२, रा. गौळवाडी, सर्व ता. चंदगड) या सहाजणांविरुद्ध गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

या प्रकरणातील अनिल जोतिबा तळगूळकर याच्यावर खंडणी व महिलेवर अत्याचार असे दोन गुन्हे दाखल असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित पाच संशयित आरोपी फरार आहेत.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, पीडित तरुणी ही पोलीस भरतीच्या इच्छेने फाट्यावरील एका अकॅडमीत शिकत होती. त्यावेळी तुला नोकरी लावतो म्हणून पीडित तरुणीकडून अनिल तळगूळकर व महेश शहापूरकर यांनी सहा लाख रुपये घेतले. अनिलने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर अनेकदा अत्याचार केले.

दरम्यान, नोकरीसाठी दिलेले पैसे पीडित तरुणीने परत मागितल्यानंतर अनिलने ते पैसे परत न देता पीडित तरुणीला मारहाण करून तिच्या आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकीही दिली. याबाबत पोलिसांत तक्रार करण्यास गेले असता भरत गावडे (रा. आसगाव), बाबू शहापूरकर व महेश शहापूरकर (रा. मांडेदुर्ग), विश्वनाथ ओऊळकर व उदय पाटील यांनीही तक्रार मागे घेण्यासाठी धमकावल्याचे पीडितेने म्हटले आहे. त्यानंतर या तरुणीने या सहाजणांविरुद्ध गडहिंग्लज पोलिसांत फिर्याद दिली. संबंधित संशयित आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा नोंद झाला असून, चंदगड पोलीस अधिक तपास करीत आहेत.