कागलमध्ये परप्रांतीय अधिकाऱ्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:22 IST2021-04-12T04:22:34+5:302021-04-12T04:22:34+5:30

कागल : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील एका कापड कंपनीत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांनी कंपनीतील ...

Assault on a foreign official in Kagal | कागलमध्ये परप्रांतीय अधिकाऱ्याला मारहाण

कागलमध्ये परप्रांतीय अधिकाऱ्याला मारहाण

कागल : कागल

पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील एका कापड कंपनीत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांनी कंपनीतील अधिकारी काम चुकले म्हणून रागवून बोलला. हा राग मनात धरून परप्रांतीय अधिकाऱ्याला बेदम मारहाण केली. हा प्रकार कागल येथे शनिवारी रात्री घडला आहे.

विकास द्विवेदी (मूळ गाव : अलाहबाद, उत्तर प्रदेश) सध्या रा. जयसिंगराव पार्क कागल) असे या अधिकाऱ्याचे नाव असून त्याच्या तक्रारीनंतर कागलमधील तिघांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कुणाल मांजरे (शाहू काॅलनी), विशाल पठाडे (येशीला पार्क), मुस्कान बागणीकर आणि तिचे चार -पाच साथीदार अशी आरोपींची नावे आहेत. कंपनीत कामावर असताना गुणवत्ता नियंत्रण अधिकारी असलेल्या विकास द्विवेदी यांनी हेल्पर म्हणून काम करणाऱ्या या तिघांना काही तरी बोलले होते. शनिवारी रात्री साडेआठ वाजता विकास यांना दुचाकीवरून श्रमिक वसाहतीनजीक नेत संबंधित आरोपींनी त्यांना बेदम मारहाण केली. तसेच रात्री एक वाजता जयसिंगराव पार्कमध्ये घरात घुसून पुन्हा मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे. मारहाणीसह लाॅकडाऊन काळात जमाव केल्याचाही गुन्हा त्यांच्यावर नोंद झाला आहे.

Web Title: Assault on a foreign official in Kagal