शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या सराफाला अटक

By admin | Updated: February 26, 2015 00:47 IST

१५ किलो चांदी हस्तगत : तीन दिवसांची पोलीस कोठडी

कोल्हापूर : दाम्पत्याकडून चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या गुजरीतील ओसवाल अलंकार ज्वेलर्सच्या मालकास बुधवारी शाहूपुूरी पोलिसांनी अटक केली. संशयित भरत रूपचंद ओसवाल (वय ३६, रा. राजाराम रोड, बिंदू चौक) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे १५ किलो चांदी पोलिसांनी हस्तगत केली. त्याच्यासह संशयित मोलकरीण हेमलता राहुल कुलकर्णी (वय ३७) यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडे चौकशी करून त्यांची करवीर पोलीस ठाण्याच्या कोठडीत रवानगी केली. मोलकरीण हेमलता कुलकर्णी हिने पती राहुल धोंडोपंत कुलकर्णी याच्या संगनमताने साइक्स एक्स्टेन्शन येथील घरमालक उप्पल शहा यांच्या घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह किमती मोबाईल असा सुमारे ३१ लाख २५ हजार किमतीच्या मुद्देमालाची चोरी केली होती. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी या दाम्पत्यास अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुजरीतील ओसवाल नावाच्या सराफाला चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने विकले. त्यातून मिळालेल्या पैशांमध्ये दोन आलिशान गाड्या खरेदी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलीस हवालदार रवी पाटील यांनी ओसवाल अलंकार ज्वेलर्सचा मालक भरत ओसवाल याला अटक केली. या घटनेनंतर सराफ बाजारपेठेत एकच खळबळ उडाली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने १५ किलो चांदी पोलिसांना परत केली. उर्वरित चांदीही मिळविण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत. ओसवाल याला अटक झाल्याने सराफ व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी करीत आहेत. (प्रतिनिधी)