लोकमत न्यूज नेटवर्क
निपाणी : प्रतिनिधी
निपाणी नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या झालेल्या बैठकीत विविध विषयांवर मंजुरी मिळाली असून निपाणीच्या सर्वांगीन विकासासाठी आपण निर्णय घेतले आहेत, अशी माहिती निपाणी नगरपालिकेचे सभापती सद्दाम नगारजी यांनी दिली. आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले की, पालिकेच्या स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत अंदाजपत्रकानुसार कामाला सुरूवात करणे, टेंडर मागवून योग्य टेंडरला मंजुरी देणे. अनेक वर्षांपासून वृत्तपत्रांच्या बाकी असलेल्या जाहिरातीची बिले देणे, शहराला असलेल्या दोन्ही प्रवेशद्वाराची दुरुस्ती करणे, पालिका सभागृहावरील फलक दुरुस्ती करणे, निपाणी वाचनालय व पालिकेतील रद्दी लिलाव पद्धतीने विकणे, शाळा सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांचा सर्वे करणे, शहरातील रस्त्यावरील खड्डे व गटारी दुरुस्त करणे अशा कामांना मंजुरी मिळाली आहे. निपाणीचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सर्व निर्णय घेतले असून नागरिकांची मतही विचारात घेतली आहेत. असे त्यांनी सांगितलॆ. यावेळी शरद सावंत उपस्थित होते.