शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गेला हत्ती कुणीकडे ?

By admin | Updated: November 29, 2015 01:03 IST

सतर्कतेचा इशारा : वनखात्याची शोधमोहीम

नेसरी : शुक्रवारी (दि. २७) अचानकपणे नेसरी परिसरात दाखल होऊन सर्वांना अचंबित केलेल्या टस्कर हत्तीची शोधमोहीम वनखात्याने दिवसभर सुरू केली. मात्र, दिवसभर हत्तीच्या मागावरून शोध घेणाऱ्या वनविभागाच्या पथकाला या टस्करने चकवा दिला. त्यामुळे हत्ती गेला कुणीकडे? असा प्रश्न वनविभागासह सर्वांना पडला आहे. आजरा तालुक्यात अनेक दिवस ठाण मांडलेल्या या टस्कर हत्तीने शुक्रवारी रात्री सिरसंगी, वाटंगी मार्गे गडहिंग्लज तालुक्यात प्रवेश केला होता. पहाटे शिप्पूर, वाघराळी, हेळेवाडी तारओहोळ नदीकाठावरून दुपारी त्याने तारेवाडी जंगल गाठले. तेथून नागरिकांना दर्शन देत तो मेटाच्या डोंगरात घुसला व सायंकाळी तारेवाडी हद्दीतील जखणी नावाच्या शेतात थांबला होता. मात्र, रात्री अचानक अकराच्या सुमारास तो तारेवाडी बंधाऱ्याजवळून हडलगे जंगलात गेल्याच्या खुणा मिळाल्या. शनिवारी दिवसभर या टस्कराच्या मागावर वनविभागाचे वनपाल, वनरक्षक व कर्मचारी होते. हडलगे जंगलात त्याची विष्ठा मिळाली. त्या मागावरून शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण त्याला यश आले नाही. दिवसभरात तारेवाडी शेती, हडलगे जंगल, सांबरे, हेळेवाडी, बिद्रेवाडी, हेब्बाळ जलद्याळ, सामानगड परिसरासह चंदगड तालुक्यातील तेऊरवाडी व कामेवाडी जंगल पिंजून काढले; पण हत्तीचे लोकेशन सापडले नाही. वनपाल एस. व्ही. राऊत, वनरक्षक संजय कांबळे, बी. एल. कुंभार, बी. बी. पाटील, आदी १३ जणांच्या पथकाने ही शोधमोहीम राबविली. परिसरात हत्ती निदर्शनास आल्यास वनविभागास कळवावे, तसेच शेतकरी व नागरिकांना सतर्कतेचा इशारा वनखात्याने दिला आहे. (वार्ताहर)