बीडशेड येथे तंबाखूविरोधी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:44 IST2021-02-06T04:44:45+5:302021-02-06T04:44:45+5:30

सावरवाडी : बीडशेड (ता. करवीर) येथील ज्ञान विज्ञान माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात सह्याद्री सेट्रिंग युनियन, कोल्हापूर जिल्हा व व्यसनमुक्त चळवळ ...

Anti-tobacco rally at Beedshed | बीडशेड येथे तंबाखूविरोधी मेळावा

बीडशेड येथे तंबाखूविरोधी मेळावा

सावरवाडी : बीडशेड (ता. करवीर) येथील ज्ञान विज्ञान माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात सह्याद्री सेट्रिंग युनियन, कोल्हापूर जिल्हा व व्यसनमुक्त चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग दिनानिमित्त तंबाखूमुक्त अभियान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या अभियान मेळाव्यात शंभर सेट्रिंग कामगार सहभागी झाले होते. यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ८० जणांनी सहभाग घेतला. गांधी व्यसनमुक्ती पुरस्कारप्राप्त अध्यापक एकनाथ कुंभार यांनी उपस्थितांना तंबाखू, विडी, सिगार, मावा, गुटखा अशा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम सांगितले. तसेच चित्र प्रदर्शनाद्वारे तंबाखू सेवनाची घातकता स्पष्ट करून कुंभार यांनी उपस्थितांना तंबाखू मुक्तीची शपथ दिली.

Web Title: Anti-tobacco rally at Beedshed