शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगाप्रश्नी आणखी एक उपसमिती

By admin | Updated: December 4, 2014 00:47 IST

उच्चस्तरीय बैठकीत निर्णय : प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृतीवर भर

 कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणप्रश्नी जाणीवजागृती, त्वरितच्या उपाययोजना यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तपासणी उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय आज, बुधवारी घेण्यात आला. पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी सर्व पातळ्यांवर एकत्रित प्रयत्न होण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या आज झालेल्या पहिल्याच बैठकीत हा निर्णय झाला. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त विकास देशमुख होते. जिल्हाधिकारी कार्यालयात बंद खोलीत ही बैठक झाली. पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी १० फेब्रुवारीपर्यंत काय केले याचा अहवाल मला न्यायालयाने १५ फेब्रुवारीपर्यंत देण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त विकास देशमुख यांनी दिली. बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना आयुक्त देशमुख बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी राजाराम माने, महानगरपालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एस. एस. डोके, आदी उपस्थित होती. आयुक्त देशमुख म्हणाले, पंचगंगा नदीच्या पर्यावरणीय अभ्यास करणाऱ्या ‘निरी’ संस्थेने प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या शिफारशी उच्च न्यायालयाने स्वीकारल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माझ्या अध्यक्षतेखाली नियंत्रण समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये एका पर्यावरणतज्ज्ञाची नियुक्ती येत्या दोन दिवसांत माझ्या स्तरावर होईल. दर दोन महिन्यांनी या नियंत्रण समितीची बैठक होईल. आजच्या पहिल्या बैठकीत प्रत्यक्ष पाहणी उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. करवीरचे प्रांताधिकारी प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपअधीक्षक, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी, आदींचा समावेश असेल. उपसमिती प्रदूषण रोखण्यासाठी कोणती कामे झाली, जाणीवजागृतीसाठी काय केले याची पाहणी करील. पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी न्यायालयाने प्रामुख्याने, प्लास्टर आॅफ पॅरिसचे गणपती न करता ते शाडूचे करावेत. विसर्जन स्वतंत्र हौदांमध्ये करावे, यासंबंधीच्या सूचना दिल्या आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी महानगपालिकेने तयार केलेल्या २६ कोटी रुपयांच्या प्रस्तावावर चर्चा झाली. याशिवाय जिल्हा परिषदेने तयार केलेल्या १०९ कोटी रुपयांच्या प्रस्तावावरही चर्चा झाली. शक्य तितक्या लवकर महानगरपालिका व ग्रामपंचायती, संबंधित खासगी उद्योगधंदे यांनी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याची सूचना केली. प्रदूषणासंबंधी तक्रारीचे निवारण करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने टोल फ्री क्रमांक सुरू करण्याची सूचना दिली आहे.